पुणे: पुणे मेट्रोचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. याच बरोबर महानगरपालिकेने उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण देखील यावेळी करण्यात येणारा आहे. मात्र हे अनावरण केवळ २५ लोकांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
प्रशांत जगताप म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण फक्त २५ लोकांच्या उपस्थितीत करणे हा महाराजांचा अपमान आहे. पुतळ्याचा लोकार्पण सोहळा पुणेकरांच्या उपस्थितीत भव्यदिव्य होणं आवश्यक आहे. मात्र, भाजप केवळ २५ लोकांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा आयोजित करुन महाराजांचा अपमान करत आहे. तसेच भाजपने घेतलेला हा निर्णय बदलला नाही तर उग्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचा देखील राष्ट्रवादीने इशारा दिला आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
केळी उत्पादक होणार आता मालामाल; शेतकरी मित्रांनो हा दुहेरी फायदा वापरून पहाच..
-
कोठडीत वाढ केल्याप्रकरणी नवाब मलिकांचे वकील म्हणाले, ‘…ईडीला गृहपाठाची गरज’
-
“कधीही विचार केला नव्हता की…”; १०० वा कसोटी सामना खेळण्यापूर्वी कोहली भावूक
-
‘सरकारने ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचं खोबरं करायचं ठरवलंय’ – डॉ. प्रकाश आंबेडकर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
