Share

‘युतीत राहण्यातच सर्वांचं भलं, शिवसेनेचा सूर नरमला’

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : ज्यातील विधानसभा निवडणूक जरी पार पडली असली तरी सत्ता कोण स्थापन करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. भाजप शिवसेना युतीमध्ये मुख्यमंत्रीपदाविषयी संभ्रम आहे. त्यामुळे हे दोनही पक्ष वेगवेगळे मार्ग स्वीकारण्याचा तयारीत आहेत. तर अपक्ष आमदारांना आपल्या ताफ्यात ओढण्यासाठी या दोन्ही पक्षांत चढाओढ पाहायला मिळत आहे.

एकीकडे शिवसेनेने थेट मुख्यमंत्रिपदावरच दावा ठोकला आहे. तर भाजपा मुख्यमंत्रिपदासह महत्त्वाची खाती शिवसेनेला सोडण्यास तयार नाही. त्यामुळे महायुतीला स्पष्ट बहुमत मिळूनही सरकार स्थापनेचा मुहुर्त लांबत चालला आहे.

दरम्यान, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी राज्यातील सरकार स्थापनेबाबत मोठे संकेत दिले आहेत. युतीत राहण्यातच सर्वांचं आणि राज्याचं भलं आहे. मात्र शिवसेनेचा योग्य सन्मान राखला गेला पाहिजे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. तसेच सगळं ठरल्याप्रमाणे आणि सुरळीत पार पडलं तरच राज्यातील सरकार स्थिर राहील, असे विधानही संजय राऊत यांनी केले.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1189540660329664512?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1189535799366144000?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1189532374129733633?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!