🕒 1 min read
पुणे – राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचं राजकीय आरक्षण संपुष्टात आलं आहे. या मुद्द्यावरुन सध्या राजकारण चांगलंच तापलं आहे. यावरुन भाजपने आज राज्यभरात चक्काजाम आंदोलन केलं. प्रमुख नेत्यांच्या नेतृत्त्वात विविध जिल्ह्यात चक्काजाम आणि जेलभरो आंदोलन करण्यात आलं. सोबतच कॉंग्रेसच्या वतीने देखील आज राज्यभर आंदोलन करण्यात आले आहे.
राज्यात सध्या अनेक राजकीय मुद्द्यांमुळे वातावरण तापले असताना आता कोरोनाने देखील पुन्हा डोके वर काढायला सुरुवात केली असताना भाजप आणि कॉंग्रेस या दोन्ही पक्षांच्या वतीने आज आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात कोरोनाचे नियम पायदळी तुडवण्यात आल्याचे दिसून आले. नुकताच पुण्यात राष्ट्रवादीच्या नूतन कार्यालयाचा उद्घाटन सोहळा पार पडला होता त्यावेळी झालेल्या गर्दीवरून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि अजित पवार यांच्यावर गर्दी जमाविल्यामुळे चौफेर टीका झाली होती. भाजपने देखील त्यावेळी टीका केली होती मग उपदेशाचे डोस दुसऱ्यांना पाजणाऱ्या भाजपवर कारवाई का केली जात नाही हा सवाल उपस्थित होत आहे.
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनावेळी झालेल्या गर्दीवरून व कोरोनाबाबतच्या नियमांवर बोट ठेवून पोलिसांनी गुन्हे दाखल केले. शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह काही नेत्याना अटकही करण्यात आली. होती.त्यावेळी भाजपने राष्ट्रवादीवर टीकेची झोड उठवली होती. आज भाजपने आयोजित केलेल्या आंदोलनालाही गर्दी झाली होती. अनेकजण विनामास्क फिरत होते. कोरोना नियमांचा फज्जा उडालेला दिसून आला. त्यामुळे, पोलिस आंदोलनाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करणार का? हा प्रश्न आहे.
भाजप शिवाय कॉंग्रेसचे नेते देखील आज रस्त्यावर उतरले होते. कॉंग्रेसच्या आंदोलनात देखील असेच चित्र पाहायला मिळाल्याने सत्ताधाऱ्यांना कोरोनाचे खरेच गांभीर्य आहे का असा सवाल उपस्थित केला तर काही गैर ठरणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमाच्या गर्दीवरून मोठमोठ्याने गळे काढणारे नेतेही या गर्दीत सहभागी झाले होते. त्यांच्यावरही कारवाई करून कायदा सर्वांनाच सारखा असल्याचे दाखवून द्यावे अशी मागणी आता होऊ लागली आहे. कोरोनाच्या नियमांचं पालन करण्याची जबाबदारी फक्त सामान्य जनतेचीच आहे का ? असा सवाल देखील यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. आजच्या सर्व प्रकारामुळे सत्ताधाऱ्यांना आणि विरोधकांना दोघांनाही कोरोनाचे गांभीर्य राहिलेले नाही हे समोर आले असून सगळे मणी एकाच माळेचे असल्याचे देखील अधोरेखित झाले आहे.
महत्वाच्या बातम्या
- …म्हणून ‘बाबा का ढाबा’च्या मालकाने केला आत्महत्येचा प्रयत्न
- पेशावरला नमवत मुल्तानने पहिल्यांदाच पटकावले पीएसएल स्पर्धचे विजेतेपद
- ‘खडसे, मुंडे, तावडेंची… याद करो कुर्बानी’, काँग्रेसच्या बॅनरने ‘धुरळा’
- पायल रोहतगीच्या अटकेवर मित्र संग्राम सिंग याचा मोठा खुलासा, म्हणाला…
- ‘युरो कप’चा फिवर पोहोचला क्रिकेटच्या मैदानात; इंग्लंड-श्रीलंका सामन्यात आली प्रचिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
