मुंबई : मुंबईतील साकीनाका येथील मन विषन्न करणाऱ्या घटनेमुळे अवघ्या महाराष्ट्राची मान शरमेने खाली झुकली आहे. साकीनाका येथील पीडित महिलेवर बलात्कार करुन तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घालण्याचा प्रकार घडला. या अत्याचारानंतर महिलेला अमानुषपणे मारहाण देखील करण्यात आली होती. दुर्दैवाने आता या महिलेचा मृत्यू झाला असून या भयंकर घटनेमुळे सर्वच क्षेत्रातून संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, पोलिसांनी आरोपीला अटक केली असून न्यायालयाने आरोपीला २१ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेबाबत पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे. ‘साकीनाका बलात्कार प्रकरणात एकच आरोपी आहे. यात दुसरा आरोपी नाही. सीसीटीव्ही फुटेजमधून दिसत आहे. बलात्कार पीडित मृत महिलेचा जबाब नोंद करता आला नाही.ती बेशुद्ध अवस्थेतच होती. त्यामुळे नक्की काय घडलेलं आहे. याबद्दल आम्ही अनभिज्ञ आहोत,’ असं नगराळे म्हणाले. पुढे ते म्हणाले, ‘पण तपासातून याबाबत लवकरच अधिक माहिती प्राप्त होईल. हा तपास लवकरात लवकर पूर्ण होईल आणि चार्जशीट दाखल केली जाईल.’
नेमकं काय घडलं ?
१० सप्टेंबरच्या रात्री ३ वाजून २० मिनिटाच्या दरम्यान खैरानी रोड साकीनाका येथे एक पुठ्ठ्याची कंपनी आहे. त्या कंपनीचा वॉचमन याने कंट्रोल रुमला फोन करून कळवलं की, इथे एका बाईला मारहाण सुरु आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कंट्रोल रुमने संबंधित पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पोलिसांना कळवलं. संबंधित अधिकारी दहा मिनिटाच्या आत तिथे पोहोचले.
तिथे त्यांना एका उघड्या टेम्पोत एक महिला अत्यंत गंभीर अवस्थेत आढळली. त्यावेळी पोलिसांनी जागेवर निर्णय घेऊन त्या महिलेला इतरत्र कुठे शिफ्ट न करता त्या टेम्पोची चावी हवालदाराने वॉचमनकडून घेऊन पोलिसांनी टेम्पो चालवत राजावाडी रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी त्या महिलेवर त्वरीत उपचार सुरु केले. चौकीदाराच्या तक्रारीवर गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती हेमंत नगराळे यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- आम्ही तुरुंगात असतांना कार्यकर्त्यांना दुःख होतं, त्यांना खाली पाहावं लागलं, याचं दुःख होतं – भुजबळ
- मोठी बातमी! गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा
- मनोहर भोसलेला न्यायालयाचा दणका; पाच दिवसांची पोलीस कोठडी
- उजळ माथ्याने मेळावे घेणाऱ्या महेबूब शेखवरही गुन्हा दाखल करा, भाजप महिला मोर्चाची मागणी
- आरोपींवर कडक कारवाई होईलच, पण वयात येतानाच मुलांना संस्कार करणं गरजेचं- रुपाली चाकणकर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

