Share

मनोहर भोसलेला न्यायालयाचा दणका; पाच दिवसांची पोलीस कोठडी

Published On: 

पुणे  : संत बाळूमामांचा अवतार असल्याचं सांगून अनेकांना गंडा घालणाऱ्या मनोहरमामा ऊर्फ मनोहर भोसलेला पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. बारामती न्यायालयाने भोसलेला 16 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आरोपी भोसले यास अतिरीक्त व जिल्हा सत्र न्यायाधीश डी.एन. गिऱ्हे यांनी १६ सप्टेंबर पर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

स्वत:ला बाळूमामांचे वंशज म्हणवणारे मनोहरमामा उर्फ मनोहर भोसले याच्या विरोधात बारामतीत आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका व्यक्तीच्या गळ्यातील थायराईड- कॅन्सर बरा करतो, असे सांगून तिघांनी संगणमत करीत रुग्णाच्या कुटुंबियांची दोन लाख ५१ हजार रुपये घेवून फसवणूक केली, हा फसवणूकीचा प्रकार गेल्या तीन वर्षांपासून सुरू होता. अखेर मनोहर भोसलेला पुणे ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दरम्यान मनोहर मामा भोसले याच्यावर पहिल्यांदा बारामतीमध्ये तक्रार दाखल झाल्यानंतर तो फरार झाला होता. महाराष्ट्र नरबळी कायद्यासह इतर अमानुष अनिष्ठ व अघोरी प्रथा, जादूटोणा, औषध चमत्कारी उपाय करणे, फसवणूक करणे, जीवे मारण्याची धमकी देणे आदी कलमाच्या आधारे पोलिसांनी वरील संशयित आरोपी मनोहर मामा व त्याच्या साथीदारांविरुद्ध कारवाई केली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!