Share

‘केवळ राज्यसभा निवडणुकीबाबत चर्चा; अन्य कुठलाही प्रस्ताव नाही’, महसूलमंत्र्यांचे स्पष्टीकरण

Published On: 

मुंबई : आज काँग्रेस नेते फडणवीसांच्या भेटीला गेल्याने राजकीय क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे. काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी काँग्रेसकडून रजनी पाटील यांचे तर भाजपकडूनही संजय उपाध्याय यांचे नामांकन दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यसभेची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी याकरीता काँग्रेसकडून प्रयत्न सुरु असून याच पार्श्वभूमीवर आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

यासंदर्भात प्रतिक्रिया देत थोरात म्हणाले की,’भेटी दरम्यान फक्त राज्यसभा निवडणुकीबाबत चर्चा झाली. अन्य कुठलाही प्रस्ताव भाजपकडून ठेवण्यात आला नाही’. तसेच एखाद्या दुर्दैवी घटनेमुळे जागा रिक्त होते तेव्हा महाराष्ट्राची परंपरा आहे की ती निवडणूक बिनविरोध करायची. त्यानुसार आज देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी आपण कोअर कमिटीशी चर्चा करुन निर्णय घेऊ असं सांगितल्याचं थोरात म्हणाले. या व्यतिरिक्त दुसरी कुठलीही चर्चा झालेली नाही असेही थोरात म्हणाले.

दरम्यान, काँग्रेसने भाजपसमोर लोटांगण घातले या चर्चेसंदर्भात बोलतांना ते म्हणाले की,’लोटांगण नाही किंवा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस नाराज नाही. याबाबत सर्वांना माहिती होती. ही परंपराच आहे. त्याचबरोबर आम्हाला निवडणूक जिंकण्याची पूर्ण खात्री आहे. परंतु महाराष्ट्राची परंपरा, जो प्रघात आहे तो कायम राहावा म्हमून फडणवीसांची भेट घेतली. ती दोघांचीही जबाबदारी आहे.’

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!