लखनौ – अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस उत्तर प्रदेश सरकारने केली आहे. नरेंद्र गिरी यांच्या मृत्यू प्रकरणी संतांकडून सतत सीबीआय चौकशीची मागणी केली जात होती. अखेर उत्तर प्रदेश सरकारने या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस बुधवारी रात्री केली.
दरम्यान, मृत्यूचं कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून पोस्टमॉर्टम करण्यात आलं. या पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट समोर आला असून फास घेतल्याने गुदमरुन मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं आहे. यामुळे नरेंद्र गिरी यांनी आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालं आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रयागराजमधील एसआरएन हॉस्पिटलमध्ये पाच डॉक्टरांच्या टीमकडून पोस्टमॉर्टम करण्यात आला. यावेळी त्यांनी व्हिडीओ रेकॉर्डिंगदेखील केलं आहे.
नरेंद्र गिरी यांच्या शरीरावर कोणत्याही जखमेच्या खुणा नाहीत. यामुळे त्यांनी आत्महत्या केली असल्याचं स्पष्ट होत आहे. “पोस्ट मॉर्टम रिपोर्टमध्ये नरेंद्र गिरी यांच्या गळ्याभोवती फास घेतल्यानंतर येणारा व्ही मार्क दिसत आहे,” अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान पोस्टमॉर्टम करणाऱ्या डॉक्टरांना व्हिसेरा जपून ठेवण्यास सांगण्यात आलं आहे. जेणेकरुन इतर कोणत्या शक्यतांबाबतही स्पष्टता येईल.
महत्त्वाच्या बातम्या
- एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मागणीची मुख्यमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल; म्हणाले, ‘कोणत्याही परिस्थितीत…’
- कोरोनाने मरण पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना मिळणार ५० हजार रुपये, केंद्राची माहिती
- शेतकऱ्यांच्या डोळ्यांत आलेले अश्रू केंद्र सरकार पुसणार आहे का? आ. धीरज देशमुखांचा सवाल
- ठरलं ! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कुठे बहुसदस्यीय तर कुठे एक सदस्यीय
- पुण्यात उभं राहणार साखर संग्रहालय; राज्य सरकारचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

