टीम महाराष्ट्र देशा : देशभरात कांद्यांच्या दरानी सर्वांच्याच डोळ्यात पाणी आणले आहे. बाजारात ४० ते ४५ रुपये किलोनी विकला जातोय तर घाऊक बाजारात कांद्याला ६० ते ७० रुपये किलो भाव मिळत आहे. कांद्याला इतका भाव असताना बिहारमधील पटना येथील एका व्यापाऱ्याच्या गोडाऊनमधून एक दोन नव्हे तर तब्बल ३२८ पोती चोरीला गेली आहे. बाजारभावानुसार चोरीला गेलेल्या कांद्याची किंमत आठ लाख रुपये आहे. इतका कांदा चोरीला गेल्यामुळे व्यापाऱ्याच्या डोळ्यात मात्र पाणी आले आहे.
पोलीस अधिकारी मनीष कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, धीरज कुमार यांनी कांद्याची ३२८ पोती चोरीला गेल्याची तक्रार केली आहे. चोरांनी कांद्यासोबत तिजोरीतील १.८३ लाखांची रोख रक्कमही लंपास केली असल्याचं व्यापाऱ्याने तक्रारीत म्हटलं आहे. गोडाऊनच्या सुरक्षारक्षकाने पाहिल्यानंतर चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. आम्ही सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोरांचा शोध लावण्याचा प्रयत्न करत आहोत,”
देशभरात मुसळधार पावसामुळे पिकांचं नुकसान झाल्यामुळे बिहारामध्ये कांद्याचा भाव गगनाला भिडला आहे.
बिहारला महाराष्ट्र, कर्नाटक आणि पश्चिम बंगालमधून कांदा निर्यात होतो. जुलै महिन्यात कांद्याचा दर १८-२० रुपये किलो होता. गेल्या आठवड्यात हा दर ७० रुपयांवर पोहोचला. सणासुदीचे दिवस असल्यामुळे येणाऱ्या दिवसांत कांदा ८० ते ९० रुपयांपर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे.
Bihar: An onion trader has alleged that onions worth over Rs 8 lakhs were stolen from his godown in Fatuha area of Patna. Police say,"Investigation will be conducted in the case." (23.09) pic.twitter.com/eCjRCiLqV0
— ANI (@ANI) September 24, 2019
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

