🕒 1 min read
मुंबई : भारतासह जगभरात क्रिकेटचे वेड पाहायला मिळते. सध्या क्रिकेटचं वेड जगभरात पाहायला मिळत असलं तरी देखील भारतामध्ये क्रिकेटप्रेमी फार दिसून येतात. असेच काही क्रिकेटप्रेमी ग्राउंडवर नेहमीच काही तरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतात आणि चर्चेत येतात पण या वेळी क्रिकेटवेडापाई भलतीच घटना घडल्याचं दिसत आहे.
मध्यप्रदेशच्या ग्वालियर येथे अशी एक घटना पाहायला मिळाली. फलंदाजाचा झेल पकडणं एका फिल्डरला फारच महागात पडले आहे. मध्यप्रदेशच्या ग्वालियर येथे आयोजित एका सामन्यात फलंदाज ४९ धावांवर झेलबाद झाला आणि ज्या फिल्डरने त्याचा झेल पकडला त्याला त्यानं बॅटनं मारलं. यानंतर त्या फलंदाजावर FIR देखील दाखल झाली आहे.
या सर्व घटनेवर पोलिस अधीक्षक यांनी सांगितले की, ज्या खेळाडूला मारहाण झाली तो खेळाडू सध्या गंभीर अवस्थेत आहे. सध्या त्याच्यावर सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. मारहाण करणाऱ्या फलंदाजांवर खेळाडूला हत्येच्या प्रयत्न केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. शनिवारी ही घटना घडली. संजय हा सध्या फरार असल्याचं सांगितलं आहे त्याला लवकरच ताब्यात घेऊन त्याच्यावर कारवाई करण्यात येइल असं देखील पोलिस अधीक्षक यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या
- अक्षय कुमारच्या तब्येतीत बिघाड ; पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल
- लॉकडाऊन असले तरीही आयपीएल सामने मुंबईतच होणार : सौरभ गांगुली
- केंद्राच्या मदतीशिवाय राज्य सरकार कोरोनाविरोधातील लढाई लढत आहे – नाना पटोले
- बीड जिल्हा; लॉकडाऊन उठविले, मात्र हॉटेल, रेस्टॉरंट बंदच
- मृदा व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख कोरोना पॉझिटिव्ह
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
