Share

अक्षय कुमारच्या तब्येतीत बिघाड ; पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : गेल्या काही दिवसापासून राज्य आणि देशात कोरोनाच्या रुग्णाचे प्रमाण दिवसेदिवस वाढतच आहे. कोरोनाच्या या लाटेने हिंदी तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकाराना आपल्या जाळ्यात ओढले आहे. मागील काही दिवसापासून बॉलिवूडमध्ये एकापाठोपाठ अनेक कलाकाराना कोरोनाची लागण झाली आहे.

यातच बॉलिवूडच्या खिलाडी कुमारला कोरोनाची लागण झाली. याची माहिती अक्षय कुमारने स्वतः ट्विट करून दिली.  रविवारी सकाळी अक्षय कुमारची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यांनतर अक्षय कुमार ट्विट करून म्हणाला, ‘आज सकाळी माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी स्वतःला क्वारंटाइन करून घेतले आहे. माझ्या संपर्कात जे आले आहेत त्यांनी देखील कोरोना चाचणी करून घ्यावी’ असे आवाहन देखील अक्षय कुमारने केले होते.

पुन्हा अक्षय कुमारने सोशल मीडियावरून तब्बेतीच अपडेट दिली आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर अक्षय कुमारची प्रकृती सध्या काहीशी खालावली आहे. तर, पुढील उपचारासाठी अक्षय कुमारला पवईतील हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अक्षय कुमारने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, “तुमच्या सर्व शुभेच्छा आणि प्रार्थनांबद्दल धन्यवाद, त्या सगळ्या खरंच काम करत आहेत. मी आता बरा आहे, परंतु वैद्यकीय सल्ल्यानुसार खबरदारी म्हणून मी रुग्णालयात दाखल होत आहे. मला लवकरच घरी परत येण्याची आशा आहे. काळजी घ्या.’

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!