Share

पवारांच्या अत्यंत निकटवर्तीयांपैकी एक असणाऱ्या राष्ट्रवादीच्या ‘या’ माजी आमदाराचे झाले निधन

Published On: 

सोलापूर– सोलापूरचे माजी आमदार युन्नूसभाई शेख यांचे प्रदीर्घ आजाराने आज सकाळी साडेअकराच्या दरम्यान निधन झाले. ते ऐंशी वर्षांचे होते. कालच त्यांना सोलापूरच्या अश्विनी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्या पश्चात चार मुले तीन मुली असा परिवार आहे.

महापालिकेच्या राजकारणात त्यांचा दांडगा अनुभव होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी त्यांचा निकटचा संबंध होता. स्थायी समितीच्या सभापती पदावर त्यांनी उत्कृष्टरित्या काम बजावले होते. १९६९, १९७५ आणि १९८५ साली तीन वेळा ते सोलापूर महापालिकेचे नगरसेवक होते.

१९७५ मध्ये शरद पवार सोलापूरचे पालकमंत्री असताना युनूस भाई शेख यांना त्यांनी निवडून आणून महापौर केले. १९९० झाली ते विधान परिषदेवर निवडून गेले. मात्र १९९८ साली सुभाष देशमुख यांच्याकडून ते पराभूत झाले. त्यांच्या निधनाने राजकीय, सामाजिक,आणि धार्मिक स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे.

तज्ज्ञ डॉक्टरचा मुंबईत कोरोनाने मृत्यू, तब्बल 10 तास नाही मिळाला बेड

भाजपनेते ज्योतिरादित्य सिंधिया यांची तब्ब्येत अचानक बिघडली, हॉस्पिटलमध्ये केलं अॅडमिट

औरंगाबादमधून करोनाची बाधा झालेल्या दोन कैद्यांनी ठोकली धूम

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!