🕒 1 min read
औरंगाबाद : कोरोना झालेल्या हर्सूल कारागृहातील 29 कैद्यांना सद्या किलेअर्कच्या कोविड वसेंटरमध्ये उपचार घेण्यासाठी दाखल करण्यात आले आहे त्यातील सय्यद सैफ सय्यद असद व अक्रम खान गयास खान हे दोघे कैदी रात्री अकरा वाजेच्या सुमारास बाथरूममध्ये असलेल्या काचा फोडुन इमारतीचा दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून हिमायातबाग मार्गे पसार झाले.
तैमूरसह सैफ-करिनाने मरीन ड्राईव्हवर मॉर्निंग वॉकची लुटली मजा
हर्सूल कारागृहातील पोलीस उपनिरीक्षक यांनी बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या दोन्ही आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल होता. रुग्णालयातील गादीवरील अंथरुणाचा दोर करुन ते पसार झाले आहेत. किलेअर्क परिसरात महापालिकेच्या उभारलेल्या करोना उपचार केंद्रात सर्व करोनाबाधित कैद्यांवर उपचार सुरू होते.
कोरोनाचे चुकीचे रिपोर्ट देणाऱ्या लॅबला मनसेने दाखविला इंगा
रविवारी रात्री पहिल्या मजल्यावरील पहारेकरी लघुशंकेला गेला असताना महापालिकेचे कर्मचारी नाडे यांनी दोघांना पळून जात असताना पाहिले. खिडकीचे गज वाकवून बेडशीटची दोरी करुन ते पळाले. अन्य आरोपीवर देखरेख करण्यास सांगून पहरेकऱ्यांनी शोधही घेतला. दिल्ली गेट जवळ ते लपून बसल्याचे दिसले. पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा दिल्यानंतरही अंधाराचा फायदा घेऊन ते पळाले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
