औरंगाबाद : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर औरंगाबादकडे जाणाऱ्या दुचाकीला भरधाव कारने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला तर पतीसह पुत्र गंभीर झाल्याची घटना औरंगाबाद- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील थापटी तांडा येथे सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पाचोड येथील गोरख भालशिंगे कुंटूब आपल्या दुचाकी क्र.(एम.एच.२०सी.एफ १५४१)पत्नी व मुलासह जात असताना थापटी ताडां शिवारात पाठीमागून येणाऱ्या भरधाव कारणे दुचाकीस जोरदार धडक दिल्याने १).गोरख पुंजाराम भालशिंगे (वय ४०) वर्षे २).तारा गोरख भालशिंगे(३७ वय)३).सागर गोरख भालशिंगे (१४ वय) वर्षे, रा.पाचोड हे जखमी झाले,
या अपघाताची माहिती स्थानिक नागरिकांनी तात्काळ पाचोड पासून जवळ असलेल्या भोकरवाडी येथिल आय.आर.बी च्या टोलनाक्यावर कळवताच रुग्णवाहिका कर्मचारी आत्मराम गाडेकर,महेश जाधव,विठ्ठल गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेऊन या जखमींना औरंगाबाद येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान तारा गोरख भालशिंगे यांची प्राणज्योत मालवली. या घटने मूळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून या अपघाताची नोंद पाचोड पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादर गोरख कणसे, हनुमान धनवे करत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- उस्मानाबादला मोठा दिलासा; तब्बल दीड महिन्यानंतर रुग्णांच्या संख्येत घट
- लॉकडाऊनमुळे रोजगार गेला, हप्ते भरायला पैसे नाही; शेवटी गळफास लाऊन केली आत्महत्या!
- इंग्लंड दौऱ्याआधी जडेजाने शेअर केला धोनीसोबतचा जुना फोटो; आठवणीला दिला उजाळा
- बीडमध्ये ७०३ नवे रुग्ण तर ८८७ रुग्ण कोरोनामुक्त!
- …तर काँग्रेसला योग्य तो विचार करावाच लागेल, नितीन राऊत आक्रमक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

