औरंंगाबाद : भारत पेट्रोलियम कार्पोरेशन कंपनीच्या गॅस एजन्सीचा परवाना आणि डिलरशीप देण्याचे फेक जाहिरातीव्दारे आमिष दाखवून उद्योजकाला ५६ लाखांना गंडविल्याप्रकरणी औरंगाबाद सायबर पोलिसांनी अटक केलेल्या नितीश कुमार जितेंद्र प्रसाद सिंग (वय २४, रा. हतीयारी बिमनवान काशी चौक नालंदा बिहार) याला सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस.एम. कादरी यांनी दिले आहेत.
एमआयडीसी वाळूज परिसरातील व्यावसायीक चांगदेव सोमीनाथ तांदळे (वय ४९, रा. सिडको वाळुज महानगर-१, प्लॉट क्र. १०, सिडको कार्यालयाजवळ) यांची रविकिरण इंटरप्राईजेस नावाची कंपनी आहे. शहरातील एका दैनिकात १ ऑगस्ट २०१९ रोजी भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमीटेड कंपनीच्या गॅस एजन्सीची जाहिरात प्रकाशीत झाली होती. या जाहिरातीव्दारे भामट्यांनी तांदळे यांना सुमारे ५६ लाख ६४ हजार ७०० रुपयांना गंडा घातला. प्रकरणात सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी या गुन्ह्यात यापुर्वी कालु शेख नेश मोहम्मद उर्फ शहाजहान, मोहम्मद अहसान रजा मोहम्मद ताहेर अलम उर्फ करिम, राजन कुमार नवल किशोर प्रसाद आणि बिनोद कुमार सिंह रामजी सिंह या चौघांना अटक केली असून सर्व आरोपी हर्सुल कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेत टीम इंडिया उठवणार ‘या’ गोष्टीचा फायदा!
- महाराष्ट्र सावरतोय ; राज्यातील कोरोना रुग्णसंख्येतील घट कायम
- मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचं गूढ वाढलं, अहवालातून धक्कादाय माहिती आली समोर
- लिंब, बेहडा, बांबू, ताम्हणसह औरंगाबाद मनपाने केली १० हजार वृक्षांची लागवड
- कोरोना रूग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करा – अजित पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

