🕒 1 min read
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात सर्कल व गाव निहाय बैठका घेऊन पुन्हा या महाराष्ट्रात मराठा वादळ निर्माण केल्याशिवाय आणि आपल्या मागण्या व मराठा आरक्षण घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. केंद्र व राज्य सरकारला धारेवर धरणार असल्याचा गंभीर इशारा ठोक मोर्चाचे मुख्य समन्वयक रमेश केरे पाटील यांनी दिला आहे. औरंगाबाद येथे मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने लवकरच दंडुका आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात येणार असून मोर्चाच्या पुर्व तयारीसाठी रविवार (दि.२७) बिडकीन येथे आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी मराठा क्रांती ठोक मोर्चाचे मुख्य समन्वयक रमेश केरे पाटील, समन्वयक अप्पासाहेब कुढेकर, नाशिकचे समन्वयक तथा छावा क्रांतीविर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीचे आयोजन स्वाभिमानी छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनोज पाटील मुरदारे यांनी केले होते. यावेळी समन्वयक करण गायकर म्हणाले की, राज्यातील सर्व समन्वयक मराठा आरक्षणासाठी एकञीत लढा देत असुन सर्वांच्या मागण्या एकच आहेत. युवराज छञपती संभाजी महाराज यांंच्या नेतृत्वात आम्ही मुक आंदोलनाला सुरूवात केली असुन सरकार दरबारी मागण्या देखील मांडल्या आहेत.
राज्य सरकार हि त्याविषयी सकारात्मक विचार करत असुन सरकारने २० ते २५ दिवस मागितले आहेत. काहींना वाटले मुक आंदोलन बंद झाले माञ आंदोलन चालुच असुन छञपती संभाजी महाराज यांच्या नेतृत्वात आरक्षणाची लढाई लढत आहोत. समन्वयक अप्पासाहेब कुढेकर म्हणाले की, ५८ मुक मोर्चे निघाले माञ त्या मोर्चाला नेतृत्व मिळाले नाही. आता युवराज छञपती संभाजी महाराज यांच्या रूपाने मराठा समाजाला एक चांगले नेतृत्व मिळाले असुन समाजाने एका छताखाली येऊन संभाजी महाराजांसोबत खंबीरपणे उभे रहावे.
छञपती संभाजी महाराज ३ जुलै रोजी औरंगाबाद दौऱ्यावर येणार असुन ते वेरूळ येथिल शहाजीराजे यांच्या गढीवर महाराजांना अभिवादन करून पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी मराठा मोर्चाचे समन्वयक व विविध मराठा संघटनेच्या प्रतिनीधींशी बैठक घेणार आहेत. या बैठकीला औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व मराठा समन्वयक व सर्व मराठा संघटनेच्या प्रतिनीधींनी उपस्थीत रहावे असे अवाहन कुढेकर यांनी केले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मराठा आरक्षणाचा मुद्दा मीच लोकसभेत सर्वप्रथम मांडला’, भाजप खा.प्रीतम मुंडेंचा दावा
- पुणे शहराचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी सर्व विभागांनी समन्वय, सहकार्याने काम करा – अजित पवार
- खा.प्रीतम मुंडेंकडून नगर-बीड रेल्वे मार्ग कामाची पाहणी
- पंतप्रधान मोदी आजही उद्धव ठाकरे यांच्यासाठी ‘नरेंद्रभाई’ – संजय राऊत
- परिवार संवाद दौरा स्थगित; राष्ट्रवादीने विरोधी पक्षाला दिली स्वतः टीका करण्याची संधी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
