Share

पुन्हा एकदा ‘बबली’ स्टाईलने राणी मुखर्जी झळकणार पडद्यावर …..

Published On: 

मुंबई : अभिनेत्री राणी मुखर्जी आणि अभिषेक बच्चन यांचा ‘बंटी और बबली’ हा चित्रपट चांगलाच लोकप्रिय ठरला होता. आता पुन्हा एकदा ‘बबली’स्टाईलने राणी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून राणी मुखर्जी सोबत सैफ अली खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाच्या प्रमोशनचा व्हिडिओ समोर आला आहे. चित्रपटात राणी मुखर्जी आणि सैफ अली खान सोबत सिद्धांत चतुर्वेदी सुद्धा झळकणार आहे.

राणी मुखर्जी आणि सैफ अली खान त्यांच्या आगामी चित्रपट ‘बंटी और बबली २’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. याआधी ‘हम तुम’ चित्रपटातील सैफ अली खान आणि राणी मुखर्जीची रोमँटिक जोडी प्रेक्षकांना खुप आवडली होती. आता पुन्हा एकदा ही जोडी ‘बंटी और बबली२’ मधून पडद्यावर झळकणार आहे. चित्रपटातील प्रमुख कलाकारांनी चित्रपटाच्या प्रमोशनला सुरुवात सुद्धा केली आहे. ज्याचा एक व्हिडिओ नुकताच समोर आला आहे, ज्यामध्ये राणी, सिद्धांत चतुर्वेदीसोबत फोटोसाठी पोज देताना दिसत आहे. आता १५ वर्षानंतर या चित्रपटाचा सिक्वल प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून चित्रपट येत्या १९ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

सध्या व्हायरल होणार यांचा व्हिडिओ राणी मुखर्जी आणि सैफ अली खानच्या आगामी ‘बंटी और बबली २’ चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यानचा आहे. या व्हिडिओमध्ये ‘बंटी और बबली२’ चित्रपटाची संपूर्ण टीम चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रणवीर सिंगच्या ‘द बिग पिक्चर’ कार्यक्रमात सहभागी झाल्याचे दिसत आहे. यावेळी राणी आणि सिद्धांत चतुर्वेदी मस्ती करत असतानाचा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला. ज्यामध्ये राणी सिद्धांतसोबत फोटो पोज देताना दिसत आहे. यामध्ये राणी खूपच सुंदर आणि स्टायलिश दिसत आहे. व्हिडिओत राणीने रंगीत प्लाजो आणि पांढरा टॉप परिधान केला असून, त्यात ती कमालीची दिसत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!