मुंबई : २०१९ मध्ये आजच्या दिवशी (On This Day 22 जून), भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने अफगाणिस्तानविरुद्ध हॅट्ट्रिक घेतली. ५० षटकांच्या विश्वचषकात हॅट्ट्रिक घेणारा तो दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी १९८७ मध्ये चेतन शर्माने हा पराक्रम केला होता. चेतनने न्यूझीलंडविरुद्ध ही कामगिरी केली. शमीच्या शानदार गोलंदाजीमुळे भारताने अफगाणिस्तानवर ११ धावांनी मात केली.
२२५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानची सुरुवात खराब झाली आणि मधल्या षटकांतच त्यांनी दोन गडी गमावले. असगर अफगाण आणि मोहम्मद नबी यांनी भागीदारी करण्याचा प्रयत्न केला पण असगरला युझवेंद्र चहलने बाद केले. यानंतर नबीने नजीबुल्ला आणि राशिद खान यांच्यासोबत छोट्या भागीदारी केल्या.
On this day, in the 2019 World Cup, Mohammed Shami became the fourth Indian to take an ODI hattrick, achieving the feat in India's win over Afghanistan. pic.twitter.com/G2VkVSGpnF
— Wisden India (@WisdenIndia) June 22, 2022
डावातील शेवटचे षटक टाकण्यासाठी मोहम्मद शमी आला आणि पहिल्याच चेंडूवर नबीने चौकार मारला. तिसऱ्या चेंडूवर शमीने नबीला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. या सामन्यात नबीने ५२ धावांची खेळी खेळली. यानंतर शमीने पुढच्या दोन चेंडूंवर आफताब आलम आणि मुजीब उर रहमान यांना बाद करत हॅट्ट्रिक पूर्ण केली. या सामन्यात शमीने ९.५ षटकात ४ गडी बाद केले आणि ४० धावा दिल्या.
तत्पूर्वी, भारतीय संघाला केवळ २२४ धावाच करता आल्या. भारताकडून विराट कोहलीने ६७ तर केदार जाधवने ५२ धावांचे योगदान दिले. कमी धावा करूनही भारतीय संघाने शमीच्या शानदार गोलंदाजीमुळे सामना ११ धावांनी जिंकला. भारताने या विश्वचषकात चमकदार कामगिरी केली आणि उपांत्य फेरी गाठली जिथे भारताला न्यूझीलंडविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

