Share

२९ वर्षांपूर्वी शेन वॉर्नला एका चेंडूने बनवलं होतं ‘फिरकीचा जादूगार’, वाचा सविस्तर…!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आजचा दिवस क्रिकेट चाहत्यांच्या कायम आठवणीत राहील. कारण ४ जून १९९३ हा दिवस त्या दिग्गजाच्या स्मरणाचा दिवस आहे ज्याने लेग स्पिनची कलाच पूर्णपणे बदलून टाकली. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात त्याने असा चेंडू टाकला की फलंदाजी करणाऱ्या माईक गॅटिंगला धक्काच बसला आणि सारे जग आश्चर्यचकित झाले की, हे कसे शक्य आहे? पण ते म्हणतात ना जादूगार आपल्या जादूने जे शक्य नाही ते करून दाखवतो. त्या दिवशी महान लेगस्पिनर शेन वॉर्नने ही गोष्ट करून दाखवली. त्याच्या चेंडूला “बॉल आफ द सेंचुरी” असे संबोधले गेले. जो त्या चेंडूला दिलेला सन्मान म्हणता येईल. या खास दिवसाच्या स्मरणार्थ आयसीसीने महान लेग-स्पिनरची काही छायाचित्रे पोस्ट केली आहेत.

अॅशेस मालिकेतील पहिल्याच सामन्यात वॉर्नने त्याच्या गोलंदाजीत अशी जादू केली की पहिल्या डावात २८९ धावा करणाऱ्या ऑस्ट्रेलियासमोर इंग्लंडचा संघ केवळ २१० धावांवरच गारद झाला. या सामन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या डावात वॉर्नने ४-४ विकेट घेतल्या आणि संघाला १७९ धावांनी विजय मिळवून दिला.

तो चेंडू ठरला ‘बॉल आफ द सेंचुरी’

२८९ धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडला पहिला धक्का माईक अर्थटनच्या रूपाने ७१ धावांवर बसला. त्यानंतर इंग्लंड संघाच्या धावसंख्येत फक्त ९ धावांची भर पडली होती की वॉर्न गोलंदाजीला आला. वॉर्नने टाकलेला चेंडू वाइड लेगवर टप्पा पडल्यानंतर इतका फिरला गेला की इंग्लंडचा फलंदाज माईक गॅटिंगच्या ऑफ स्टंपला जाऊन धडकला. गॅटिंगला धक्काच बसला त्याला कळत नव्हते की हे कसे काय घडले. तो काही वेळ क्रीजवरच उभा राहिला. या चेंडूमुळे शेन वॉर्नला जगात फिरकीचा जादूगार म्हणून ओळखायला लागले.

१९९० च्या दशकात कारकिर्दीला सुरुवात करणारा वॉर्न कसोटी क्रिकेटमध्ये ७०० बळी घेणारा पहिला गोलंदाज होता. २००७ मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधुन सन्यास घेतला होता. त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल सांगायचे तर, त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ७०८ आणि एकदिवसीय सामन्यात २९३ बळी मिळवले आणि क्रिकेट विश्वात अशी ओळख निर्माण केली ज्याने अनेक तरुण गोलंदाजांना प्रभावित केले.

२०२२ चा मार्च महिना क्रिकेट चाहत्यांसाठी एवढी वाईट बातमी घेऊन येईल याची कोणी कल्पनाही केली नव्हती. ४ मार्च रोजी या महान क्रिकेटपटूने जगाचा निरोप घेतला. शेन वॉर्न आज आपल्यात नसला तरी येणाऱ्या काळात अनेक तरुण पिढी त्याच्या योगदानाने प्रभावित होत राहतील.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!