मुंबई : गेल्या तीन दशकांमधील भारतीय संगीत क्षेत्रातील दिग्गज गायक केके यांचे वयाच्या ५३ व्या वर्षी निधन (KK dies at 53) झाले. कोलकाता येथे एका कार्यक्रमादरम्यान परफॉर्म करत असताना केकेला अस्वस्थ वाटत होते. त्यामुळे तो परत हॉटेलवर गेला. तसा तो कोसळला. त्यानंतर त्याला कलकत्ता मेडिकल रिसर्च इंस्टीट्यूट येथे नेण्यात आले. यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यांच्या मृत्यूने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान गायिका ‘शुभलक्ष्मी डे’ यांनी केकेच्या मृत्यूबाबत मोठा खुलासा केला आहे.
गायीकेनें सांगितले, शो च्या दिवशी आजूबाजूला जास्त गर्दी पाहून केके खूप अस्वस्थ झाला होता. तो कारमधून बाहेर पडण्यास देखील नकार देत होता. एका वृत्त्वाहीनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये गायिकेने सांगितले, “ऑडिटोरियमच्या बाहेर खूप गर्दी होती. केके संध्याकाळी ५ वाजता आला होता. स्टेजवर आल्यानंतर त्यानं सर्वात आधी तिथल्या लाइट्स मंद करण्यास सांगितलं. जर त्याने त्यावेळी तब्येत ठीक नसल्याचं सांगितलं असतं तर कदाचित आम्ही शो रद्द केला असता.”
केके यांच्या निधनाने संपूर्ण इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. त्यांच्या अचानक जाण्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. बॉलीवूड तसेच राजकीय क्षेत्रातूनही अनेक दिग्गजांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

