🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : राज्यात सत्ता स्थापनेचा मोठा तिढा निर्माण झाला आहे. भाजप मोठा पक्ष ठरूनही सेनेविना सत्ता स्थापन करू शकला नाही. आता सेना आणि आघाडी एकत्र येऊन सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न करत आहे. या राजकीय परिस्थितीवर भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी सूचक विधान केलं आहे.
‘हारणार असं वाटणारी मॅचही जिंकली जाऊ शकते’ असं गडकरी यांनी एका कार्यक्रमाप्रसंगी म्हणाले आहे. तसेच ते म्हणाले की, क्रिकेट आणि राजकारणात काहीही होऊ शकतं, असे गडकरींनी सूचक वक्तव्य केले आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, कधीकधी तुम्हाला वाटतं की तुम्ही मॅच हारत आहात, मात्र निकाल पूर्णपणे वेगळा लागतो. मी नेमकाच दिल्लीहून आलो आहे, मला महाराष्ट्रातील राजकारणातील सविस्तर माहिती नाही, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.
दरम्यान, राजकारण हे क्रिकेट सारखं असत, असे गडकरी म्हणाले. गुरुवारी एकीकडे महाशिवआघाडीची बैठक झाली तर दुसरीकडे भाजपनेही आपल्या १०५ आमदारांची बैठक बोलावली होती. ज्यात राज्यातील विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1195186446111404033?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1195176592793690113?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
