🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : पिंपरी-चिंचवड भागातील आकुर्डीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 400 किलो कांदा वाटप करण्यात आला. गेल्या दोन आठवड्यापासून कांद्याच्या किंमतीत वाढ झाली असताना, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी 80 पैसे किलोने कांदे वाटले.
राजकारणात मुरलेले नेते म्हणून ओळखले जाणाऱ्या शरद पवारांचा आज ८० वा वाढदिवस आहे. एकीकडे पवारांनी उद्ध्वस्त झालेल्या बळीराजाला सावरण्यासाठी ८० लाखांचा धनादेश जाहीर केला. तर दुसरीकडे त्यांच्या पवारप्रेमी कार्यकर्त्यांनी 80 पैसे किलोने कांदे वाटले अशी कामगिरी बजावली. कांद्याच्या किंमती कडाडल्या असताना ८० पैसे किलोने कांदा वाटप केल्याने आकुर्डी परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला. हा कांदा घेण्यासाठी महिलांची अक्षरशः झुंबड उडाली होती.
दरम्यान, बुधवार पासून कांदा प्रति किलो शंभरीच्या आत आला असला तरी देखील तो सर्वसामान्य नागरिकांना परवडत नसल्याची ओरड आहे. एरवी कांद्याला भाव नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आलेला पाहायला मिळतो. मात्र, कांद्याचे दर गगनाला भिडल्यानंतर तो महाराष्ट्रातील जनतेच्या डोळ्यात पाणी आणतो आहे.
शरद पवार यांच्या ८०व्या वाढदिवसानिम्मित यशंवतराव चव्हाण सेंटर येथे बळीराजा कृतज्ञता दिन साजरा केला गेला. राज्यभरातील समर्थकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनीही शरद पवार यांच्याबद्दलच्या आठवणी जागवत शुभेच्छा दिल्या असून आभार व्यक्त केले आहेत.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1205112886877544448?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1205112381682008065?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
