Share

मनसेचा १३ वा वर्धापन दिन,लोकसभा निवडणुकीसंदर्भात राज ठाकरे करणार मोठी घोषणा

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्रातील मराठी लोकांसाठी लढणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) आज १३ वा वर्धापनदिन आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्र सैनिकांना सोशल मिडीयाच्या माध्यमातून वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘१३ वा वर्धापन दिन सोहळा’ शनिवार दि. ९ मार्च २०१९ रोजी सायंकाळी ५:०० वाजता, रंगशारदा हॉल, वांद्रे(प), मुंबई. येथे साजरा करण्यात येणार असून प्रमुख वक्ते म्हणून मनसे अध्यक्ष्ण राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान,लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. मनसे लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याच्या बातम्या मध्यंतरी प्रसिद्ध झाल्या होत्या . आज होणाऱ्या राज ठाकरे यांच्या भाषणात ते काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!