🕒 1 min read
मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ या दोन दिग्गज नेत्यांमधील वाद आणि यावरून सुरु असलेले राजकारण उभा महाराष्ट्र पाहत आहे. कोल्हापूर येथे जात असताना सोमय्या यांना कराड पोलिसांनी आज मंगळवारी पहाटे ओगलेवाडी येथील रेल्वे स्टेशनवर ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांनी कराड येथेच पत्रकार परिषद घेतली. सोमय्या यांना कोल्हापूर जिल्ह्यात जाण्यास मनाई केल्यानंतर ते मुंबईत परतले आहेत.
मुंबईत परतताच भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. कार्यकर्त्यांनी खांद्यावर उचलत सोमय्या यांचा जयजयकार केला. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. ‘किरीटजी तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं…’ अशा घोषणांनी कार्यकर्त्यांनी परिसर दणादून सोडला होता.
यावेळी सोमय्या यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना ठाकरे सरकार, मुंबई महानगरपालिकेवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. यावेळी राज्य मंत्रिमंडळाचा ‘४० चोर मंत्रिमंडळ असा उल्लेख करत आता गंभीर लढाईला सुरुवात झाली असून आम्ही आता या महाराष्ट्राला घोटाळेमुक्त करणार, असा इशारा त्यांनी दिला.
तसेच सोमय्या यांनी आपला मोर्चा आता शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याकडे वळवल्याचे यावेळी दिसून आले. ‘राऊत यांनी कालसोमय्या यांच्यासोबत जे झाले, त्याचा आमच्याशी काहीही संबंध नाही, असे भाष्य केले. हे तेच आहेत ज्यांनी बीएमएसी बँकेच्या डीपॉझिटरचे ५५ लाख रुपये ढापले होते. हाच चोरीचा माल त्यांना परत करावा लागला होता’ असे वक्तव्य सोमय्या यांनी केले. सोमय्या यांच्या या विधानाचा अर्थ घेतल्यास राऊत यांनी बीएमसी बँकेत ५५ लाखांचा गैरव्यवहार केला होता असा आरोप केल्याचे दिसून येतेय.
महत्त्वाच्या बातम्या
- सोमय्यांच्या रडावर आता ठाकरे कुटुंबीय; अलिबागला जाऊन रश्मी ठाकरेंच्या बंगल्यांची पाहणी करणार
- मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून किरीट सोमाय्यांवर होत असलेली कारवाई थांबवायला हवी होती – फडणवीस
- ‘सोमय्या फक्त साधन, खरे मास्टरमाईंड चंद्रकांत पाटीलच’, हसन मुश्रीफांचा आरोप
- चंद्रकांत पाटलांकडून मला भाजपात येण्यासाठी ऑफर; हसन मुश्रीफांचा गौप्यस्फोट
- कुटुंबांवर केलेले आरोप बिनबुडाचे, सोमय्यांच्या सीए पदवीवरच मला शंका-हसन मुश्रीफ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
