Share

‘अरे देवा, यांचे गुडघे दिसत आहेत की’; प्रियांका गांधींची तीरथ सिंह रावतवर टीका

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी महिलांबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. रिप्‍ड जीन्स संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्या विरोधात अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. त्यांचे हे वक्तव्य कोणालाही न पटणारे आहे. त्यांच्या या विधानानंतर देशभरातून महिलांनी संताप व्यक्त केला. जया बच्चन आणि त्यांची नात नव्या नवेलीनेही या विधानावर आपले रोकठोक मत व्यक्त केले होते. त्यानंतर आता काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी देखील रावत यांच्या वक्तव्यवर जोरदार टीका केली आहे.

प्रियांका गांधींनी आपल्या फेसबुक आणि ट्विटर अकाऊंटवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे आरएसएसच्या जुन्या पोशाखातील खाकी हाफ चड्डी परिधान केलेले फोटो शेअर करत ‘अरे देवा, यांचे गुडघे दिसत आहेत की.’, असे यात त्यांनी म्हंटले आहे.

बाल हक्क संरक्षण आयोगाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत बोलत असताना, महिला वापरत असलेल्या जीन्सबाबात त्यांनी आक्षेप घेतला आहे. ‘आजकाल महिला फाटलेल्या जीन्स घालून फिरतात, हे सगळं बरोबर आहे का? हे कसले संस्कार आहेत’असं तीरथ सिंह रावत यांनी म्हटलं आहे. या विधानावरून अनेक भागातून रावत यांच्यावर संताप व्यक्त केला जाता आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!