Share

शरद पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट; व्हाट्सऍप ग्रुप ऍडमीनसह पोलीस पाटलावर गुन्हा दाखल

Published On: 

मनमाड: व्हाट्सऍप ग्रुपवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात अतिशय खालच्या भाषेत आक्षेपार्ह मजकूर टाकल्याबद्दल दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात ग्रुप ऍडमीन सह ग्रुप सदस्य असलेल्या पोलीस पाटलाचा समावेश आहे. मनमाड येथील चांदवड तालुक्यातील देवरगाव येथील हि घटना आहे. तर या घटनेमुळे राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

गलिच्छ भाषेत आक्षेपार्ह मजकूर टाकल्यामुळे देवरगावच्या पोलीस पाटलासह ग्रुप अ‍ॅडमिनवर गुन्हा दाखल केला आहे. माणिक संपत शिंदे असं पोलीस पाटलाचे नाव आहे. तर कमलाकर शिंदे असं ग्रुप अ‍ॅडमिनचे नाव आहे. माणिक शिंदे यांनी एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर पवारांबद्दल गलिच्छ भाषेत मजकूर टाकला होता, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. यासंदर्भात टीव्ही ९ ने वृत्त दिले होते.

पुणे : उपचार मिळण्यात प्रचंड अडचणी; ‘आप’चे मनपा आयुक्त कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन

त्यानंतर या ग्रुपमधील काही लोकांनी या घटनेचा निषेध केला. तसेच या विरोधात चांदवड तालुक्याचे राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष दीपक शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वडणेरभैरव पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणानंतर राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पोलीस पाटील माणिक शिंदेला निलंबित करा, अशी मागणी केली आहे.

खुशखबर : ‘येथे’ मिळणार आयफोन11 सह अन्य अॅपल प्रोडक्ट्स स्वस्तात खरेदी करण्याची संधी

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!