Share

पुणे : उपचार मिळण्यात प्रचंड अडचणी; ‘आप’चे मनपा आयुक्त कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन

Published On: 

पुणे – पुणे शहरामध्ये सद्या कोविड, कोविड संशयित आणि बिगर कोविड रुग्णांना उपचार मिळण्यामध्ये प्रचंड अडचणी येत आहेत. बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटरचा तुटवडा जाणवत आहे. या आठवड्यात व्हेंटिलेटर नसल्याने डॉ लक्ष्मी नरसिंहन या शास्त्रज्ञासह पुण्यातील अनेक नागरिकांचा जीव हकनाक गेला आहे.

बेड,ऑक्सिजन,व्हेंटिलेटर यांचा पुणे शहरात तयार झालेला तुटवडा.ब्लॅक मार्केटिंग रोखण्याबाबत आणि येत्या काळात बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर यांची संख्या वाढवण्याबाबत आम आदमी पार्टीने दिनांक १३ जुलै आणि १५ जुलै रोजी इमेलद्वारे प्रशासनाला निवेदन दिले होते. पण परिस्थितीत फारशी सुधारणा नसल्याने याचे गांभीर्य प्रशासकोरोना नाला जाणवून देण्यासाठी आज आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पुणे मनपा आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले.

यावेळी माननीय आयुक्तांशी चर्चा करताना आम आदमी पक्षाने डॅशबोर्डवर पुणे शहरातील केवळ 42 रुग्णालये (कोविड केअर सेंटर वगळता) आहेत आणि पुण्यात खाजगी रुग्णालयांची संख्या खूप मोठी आहे, हे मांडले. जास्तीत जास्त बेड अधिग्रहित करून ते वापरात आणण्याची मागणी यावेळी आप संघटन मंत्री डॉ अभिजित मोरे यांच्याकडून करण्यात आली. पुणे शहरामध्ये कोणत्या रुग्णालयांमध्ये किती बेड उपलब्ध आहेत याची माहिती देणारा डॅशबोर्ड प्रशासनामार्फत उपलब्ध करून दिलेला आहे. पण या डॅशबोर्डवरील माहिती ही रिअल टाईम अपडेट होत नसल्यामुळे डॅशबोर्डवर रिकामे बेड दिसत असून देखील प्रत्यक्ष रुग्णालयांमध्ये फोन केल्यावर ते बेड भरल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे रुग्णांना बेड मिळण्यास प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

आज दिनांक २० जुलै २०२० रोजी बेड नाकारल्याची वस्तुस्थिती स्पष्ट करणारे कॉल रेकॉर्डिंग माननीय आयुक्तांपुढे डॉ अभिजित मोरे यांनी सादर केले, काही रुग्णांचे अनुभव मांडले आणि कारवाईची मागणी केली. तसेच पुण्यातील सर्व रुग्णालयातील कोविड व बिगर कोविड वर्गातील बेडची संख्या डॅशबोर्डवर स्पष्टपणे वेगवेगळी आणि रिअल टाईम मांडायला हवी, अशी मागणी डॉ मोरे यांनी केली.

डॅशबोर्डवर हॉस्पिटलचा पत्ता, फोन नंबर, लोकेशन अपडेट करण्याची तसेच रुग्णांसाठी तक्रार निवारण कक्ष सुरू करण्याची मागणी आप पुणे संयोजक मुकुंद किर्दत यांनी केली. सदर सर्व माहिती पुणे मनपाच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्याबाबतचा आग्रह किर्दत यांनी धरला.

मनपातर्फे ऍडमिशन व डिस्चार्जमधील अडचणी सोडवल्या जाण्यासाठी प्रत्येक मोठ्या हॉस्पिटलमध्ये रुग्णांसाठी हेल्प डेस्क चालवला जावा, अशी मागणी आप पुणे सहसंयोजक संदीप सोनवणे यांनी केली.

कोविड केअर सेंटरमधील सुविधा, स्वच्छता, सेवा व वागणूक यामध्ये  सुधारणा करण्यात यावी. तसेच कोविड टेस्टचा लिखित अथवा इलेक्ट्रॉनिक रिपोर्ट टेस्ट झालेल्या व्यक्तीला दिला जावा, अशी मागणी आप कोथरुड सहसंयोजक प्रा सुहास पवार यांनी केली.

कोविड केअर सेंटरमध्ये आयसोलेट झालेल्या रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशा लोकांना समुपदेशन करण्यासाठी सामाजिक संस्था- संघटना यांची मदत घ्यावी, अशी सूचना डॉ मोरे यांनी केली.

यावेळी मनपा आयुक्तांनी या सूचनांचे स्वागत केले. प्रशासनाने या मुद्द्यावर सुरू केलेल्या उपाय योजनांची माहिती दिली. बेडचा तुटवडा नाहीसा करण्यासाठी प्रशासनातर्फे सर्वोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

सोशल डिस्टन्स पाळत केलेल्या या आंदोलनामध्ये आनंद अंकुश, सुहास पवार, मनोज थोरात, अशोक तळेकर, संदीप पासलकर, विजय तळेकर, विनायक भुरुक, सतीश यादव, जीवन रामतीर्थे, शैलेश आवळे, आनंद अंकुश, नजीर शेख, अविनाश पवार, विनोद शिवणकर, केदार ढमाले, आकाश रोकडे, सुनील कांबळे, प्रीतम खंडागळे, विनोद शेलार, गणेश ढमाले, संदीप सोनवणे, डॉ अभिजित मोरे, मुकुंद किर्दत यांनी सहभाग घेतला.

महत्वाच्या बातम्या-

जयंत पाटील हा अत्यंत तज्ञ, बुद्धिवान आणि पंडित माणूस, पडळकरांचा जोरदार टोला

मी मुख्यमंत्र्यांवर टीका केली नाही केवळ सल्ला दिला, पृथ्वीराज चव्हाणांनी दिले स्पष्टीकरण

‘मला ३५ कोटी रुपयांची ऑफर दिली होती,मात्र तरीही मी कॉंग्रेस सोडली नाही’

…तर विरोधकांनी काहीही न खाता-पिता मोदी सरकार एव्हाना पाडलं असतं – सुधीर मुनगंटीवार

गणेशोत्सव: चाकरमान्यांसाठी दिलासा, एसटीने कोकणात जाण्यास सशर्त परवानगी

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!