पुणे : दिल्ली विद्यापीठातील कला विभागाच्या बाहेर आलेल्या विनायक दामोदर सावरकरांच्या पुतळ्यास कॉंग्रेस पक्षाची विद्यार्थी विंग असणाऱ्या नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाच्या गुंडांनी गुरूवारी काळे फासले असल्याची घटना घडली आहे. एनएसयूआयचा दिल्ली प्रदेशाध्यक्ष असलेल्या अक्षय लकराने हे संतापजनक कृत्य केले आहे. एका बाजूला सोशल मिडीयावर या घटनेचे तीव्र पडसाद पडत असताना महाराष्ट्रातील बहुतांश नेत्यांनी या प्रकरणावर मौन बाळगले असल्याचे समोर आले आहे.
गुरुवारी पहाटे एनएसयूआयचा दिल्लीचा प्रमुख अक्षय लाकरा आपल्या पदाधिकाऱयांसह विद्यापीठात घुसला आणि त्याने दुष्कृत्य केले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याची विटंबना केली. यावेळी सुरक्षा रक्षकांनी लाकरा याला रोखण्याचा प्रयत्न केला. पण लाकराने विटंबना केली.

एनएसयूआयकडून खालच्या पातळीवरील राजकारणातून करण्यात आलेले हे कृत्य भारताच्या महान स्वातंत्र्यवीरांबद्दलचा काँग्रेसचा विचार दर्शवते. कॉंग्रेस आणि या पक्षाशी निगडीत असणाऱ्या संघटना किती द्वेषाचे विष समाजात पसरवत आहेत हे या निमित्ताने पुढे आले आहे. दरम्यान, या घटनेचे पडसाद सोलापुरात उमटले आहेत. सोलापुरातील हिंदुत्ववादी संघटना सायंकाळी सहाच्या सुमारास जिल्हा परिषदेसमोरील काँग्रेस भवन येथे आले. कार्यकर्त्यांनी हातात फलक घेऊन निदर्शने केली. हिंदू महासभा, विश्व हिंदू परिषद, कृषी गोसेवा संघ यांच्या कार्यकर्त्यांनी एनएसयुआयच्या फलकावर काळी शाई फेकली.
गुरुवारी सायंकाळी ६.४५ वाजता गणेश डोंगरे यांना एनएसयुआयच्या फलकावर शाई फेकल्याचे कळले. तिथे नगरसेवक विनोद भोसले, युवक कॉँग्रेस अध्यक्ष अंबादास करगुळे, सोशल मीडिया सेलचे अध्यक्ष तिरुपती परकीपंडला हे देखील आले. त्यांनी झालेल्या प्रकाराविरोधात एनएसयुआयकडून समर्थ बंडे, सुधीर बहिरवडे, यतिराज होनमाने, किरण जाधव, संकेत अटकळे, चिदंबर कारकल यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
क्रांतिकारकांचे मुकुटमणी अशी ख्याती असलेल्या एका मराठी क्रांतिकारकाची अशा प्रकारे विटंबना झाल्यानंतर देखील सावरकरांच्या नावाने मते मागणारे नेते मंडळी गप्प आहेत. तर दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य जनता आणि देशप्रेमी नागरिक या मुद्द्यावर सोशल मिडीयावर संताप व्यक्त करीत आहेत. या भयंकर घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून एनएसयूआयच्या लाकरा आणि पदाधिकाऱयांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
महत्वाच्या बातम्या
-
विरेंद्र सेहवाग म्हणतो, ‘हा’ खेळाडू सचिनच्या १०० शतकांचा रेकॉर्ड मोडणार
-
बीसीसीआयकडून संघ व्यवस्थापनात बदल, ‘हा’ माजी खेळाडू बनला फलंदाजी प्रशिक्षक
-
जनतेने नाकारलेल्या राज ठाकरेंवर सूड उगवून आम्हाला काय फायदा : फडणवीस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
