टीम महाराष्ट्र देशा : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित असलेला ‘ठाकरे’ सिनेमा बघण्यासाठी चित्रपट रसिकांमध्ये उस्तुकता लागून राहिली आहे. चित्रपटग्रहात शिवसेनेकडून शिववडापाव उपलब्ध करून देत असतानाच आता रत्नागिरीतील शिवसेनेकडून चित्रपट रसिकांना ३ दिवस ‘ठाकरे’ सिनेमा मोफत बघायला मिळणार आहे.येत्या २५ जानेवारीला हा चित्रपट महाराष्ट्रासह देशभर प्रदर्शित होणार आहे. २५ ते २७ असे हे तीन दिवस रत्नागिरीतील लोकांना विनामूल्य पाहता येणार आहे.
रत्नागिरीमध्ये ‘ठाकरे’ चित्रपट तीन दिवस मोफत दाखविण्यात येणार आहे. शिवसैनिकांना राधाकृष्ण सिटी प्राईड येथे सहा वेळा हा चित्रपट पाहायला मिळणार आहे. रत्नागिरीचे प्रभारी नगराध्यक्ष प्रदीप ऊर्फ बंड्या साळवी यांनी पत्रकार परिषदेत या संदर्भात माहिती दिली. खासदार विनायक राऊत, आमदार उदय सामंत यांच्या सहकार्याने चित्रपटाचे शो होणार आहेत. तीन दिवस दररोज दोन शो असून दुपारी 12 ते 3 व रात्री 9 ते 12 या वेळेत ते होतील. 27 जानेवारीला शालेय मुले, कॉलेज तरुणांसाठी शो होणार आहे. तिकिटे चित्रपटगृहात उपलब्ध असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य आहे.
25 जानेवारीला ठाकरे’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर अभिजीत पानसेंनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात बाळासाहेबांची भूमिका नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी साकारली असून मीनाताई ठाकरेंच्या भूमिकेत अमृता राव दिसणार आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

