Share

आता आणखी काय-काय विकणार आहात; प्रतिभा धानोरकरांचा मोदी सरकारला सवाल

Published On: 

🕒 1 min read

चंद्रपूर:- सोमवारी संसदेत अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी अर्थसंकल्प सादर केला. कोरोना नंतरचा अनेक अपेक्षा असलेल्या या अर्थसंकल्पामध्ये विकासासाठी अनेक योजना आणण्यात आल्या असल्याच सत्ताधारी म्हणत आहेत. तर विरोधकांकडून मात्र या अर्थसंकल्पामध्ये अनेक त्रुटी असल्याचे म्हटले जात आहे.

दरम्यान, एअर इंडिया, एलआयसी विकण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. सरकारी जमिनी विकणार, बीपीसीएल पण  विकणार, हे सरकारी मालमत्ता विकणारे मोदी सरकार ठरणार आहे. आता आणखी काय विकायचे शिल्लक आहे, असा प्रश्‍न विचारत काल केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पावर वरोराच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी तिखट प्रतिक्रिया दिली.

कोरोनामुळे देशात हजारो युवकांचे रोजगार गेले. बेरोजगारांना रोजगार देण्याचे मोदी सरकारने जाहीर केले होते. रोजगार निर्मितीसाठी या बजेटमध्ये खास काहीच नसल्याचे दिसून येत आहे. आत्मनिर्भर भारत करणारे मोदी सरकार मात्र महिलांना या अर्थसंकल्पात काही देऊ शकले नाही. त्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी काहीच योजना नसल्याचे आमदार धानोरकर म्हणाल्या आहेत.

आधीच पेट्रोल आणि इतर इंधनाचे दर शंभरी पार करत आहेत. त्यात या बजेटमध्ये डिझेलवर ४ रुपये व पेट्रोलवर २.५० रुपये कृषीकर लावण्यात आला आहे. जीएसटीमधील कमतरता दूर करण्याचे केवळ आश्‍वासन दिले जात आहे. त्यामुळे देशातील व्यापारी वर्ग मोदी सरकारवर संतापलेला असल्याचे आमदार धानोरकर म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!