Share

पत्नीला 192 कोटी रुपयांची पोडगी देण्यासाठी या’ दिग्गज खेळाडूला करावी लागणार नोकरी

Published On: 

सिडनी : वैलेंटाइन डे आताच झाला सुरु आहे. सर्वत्र प्रेमाच्या रंगाने वातावरण गुलाबी केले आहे. मात्र एका दिग्गज क्रिकेटपटूच्या घटस्फोटाच्या बातमीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. एक दोन नव्हे तर लग्नाच्या सात वर्षानंतर ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज क्रिकेटपटूने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे.

सात वर्षांपूर्वी क्लार्कचा विवाह झाला होता. कायली आणि क्लार्क यांना एक मुलगीही आहे. गेल्या काही महिन्यांपासून दोघांमधील संबंध बिघडले होते. एवढेच नाही तर 5 महिन्यांपासून दोघे वेगळेही राहत होते शेवटी क्लार्कने पत्नी कायलीशी घटस्फोट घेतला आहे.

मायकल क्लार्कने घटस्फोटाबाबत, “गेल्या काही महिन्यांपासून आमच्यात वाद होते. त्यामुळं दोघांनी मिळून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही एकमेकांच्या आनंदाचा विचार करून हा निर्णय घेतला आहे”असे सांगितले. दरम्यान ऑस्ट्रेलियान मीडियामध्ये सध्या क्लार्कला घटस्फोटानंतर पोडगी म्हणून पत्नीला 192 कोटी द्यावे लागणार आहेत, अशी चर्चा आहे.

यासाठी आता क्लार्क क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आता नोकरी करणार आहे. डेली टेलीग्राफच्या बातमीनुसार, क्लार्कनं नवीन नोकरी शोधली आहे. बातमींनुसार मायकल क्लार्क आता रग्बी लीगचे दिग्गज लॉकी डेलीसोबत एका कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करणार आहे. टेरी केनेडी यांना काढल्यानंतर आता या जागी मायकल क्लार्कला ही जबाबदारी दिली आहे.

दरम्यान, मायकल क्लार्कचे आपल्या स्वीय सहाय्यक असणाऱ्या महिलेसोबत अफेअर असल्याच्या चर्चा होत्या.त्याच्या सहाय्यकाचे नाव साशा आर्मस्ट्राँग आहे. साशा क्रिकेट अकादमीचे काम सांभाळायची. याच दरम्यान, क्लार्क आणि त्यांची सहाय्यक साशा यांचे काही खाजगी फोटो सोशल मीडियावर लीक झाले होते.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!