मुंबई: गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोनाने संपूर्ण जगला घातलेला विळखा हा वाढतच आहे. या लॉकडाऊनचा खूप मोठा परिणाम उद्योग, व्यवसाय तसेच शिक्षण क्षेत्रावर पण दिसून आला. परीक्षेच्या काळात कोरोनाने राज्यात प्रवेश केला तेव्हापासून अंतिम पदवी अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यावरून केंद्र विरुद्ध राज्य आसा वाद चालू आहे. १८ जुलै रोजी यूजीसीच्या निर्णयाविरोधात युवासेनेनं न्यायालयाचा दरवाजा ठोठावला असून त्याविरोधात रिट याचिका दाखल केली होती.
युवासेनेने केलेल्या या याचिकेला आता महाराष्ट्र युवक काँग्रेस व राष्ट्रवादी युवक काँग्रेसने देखील समर्थन दिले आहे. मंत्री व युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी हि माहिती ट्विटर द्वारे दिली आहे. ट्विटमध्ये त्यांनी, ‘ युवासेनेने सुप्रीम कोर्टात केलेल्या याचिकेला महाराष्ट्र युवक काँग्रेस आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसने दिलेल्या समर्थनासाठी मी त्यांचे आभार मानतो. हा लढा प्रत्येक विद्यार्थ्याचा आहे, शिक्षकांचा आहे. आम्ही तिन्ही युवा आवाज, यूजीसीला एवढेच सांगत आहोत की लाखो जीवांशी खेळू नका,’ अशा शब्दांत हे जाहीर केले.
भारतात कोरोनाच्या समुह संसर्गाची भीती निर्माण झाली असताना मुंबईतून आली दिलासा देणारी बातमी
युवासेनेने सुप्रीम कोर्टात केलेल्या याचिकेला @IYCMaha आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसने दिलेल्या समर्थनासाठी मी त्यांचे आभार मानतो. हा लढा प्रत्येक विद्यार्थ्याचा आहे, शिक्षकांचा आहे. आम्ही तिन्ही युवा आवाज, यूजीसीला (@ugc_india) एवढेच सांगत आहोत की लाखो जीवांशी खेळू नका.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) July 19, 2020
दरम्यान, “देशात सध्या कोरोनाग्रस्तांची संख्या ही १० लाखांच्या वर गेली असून कोरोना संक्रमणाच्या जागतिक क्रमवारीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्याचे शारीरिक, मानसिक आरोग्य याची कोणतीही चिंता आणि विचार केला नाही. मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे मंत्री आणि विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) यांनी अंतिम वर्षांच्या परीक्षा मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब करून सप्टेंबर महिन्यापर्यंत घेण्याचं जाहीर केलं आहे. यूजीसीनं जाहीर केलेली मार्गदर्शक तत्त्वं अंमलबजावणीसाठी व्यावहारिक नाही,” असं युवासेनेनं म्हटलं आहे.
कोकणी जनता सत्तेचा माज उतरवतेच, भाजप नेत्याचा खासदार पुत्रावर घणाघात
तर, काही दिवसांपूर्वी यूजीसीनं अखेरच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत घेण्याचा सूचना सर्व राज्यांना केल्या. परंतु परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर राज्य सरकार ठाम होतं. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अंतिम वर्षांच्याही परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना सरासरी गुण देऊन उत्तीर्ण केलं जाणार असे राज्य सरकारने अशी भूमिका घेतली आहे.
राष्ट्रवादीच्या निष्ठावंत कार्यकर्त्याच्या निधनानंतर शरद पवार थेट त्या कार्यकर्त्याच्या घरी…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

