सिंधुदुर्ग : शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांचा मुलगा गीतेश राऊत याने कणकवलीमध्ये पोलिसांशी हुज्जत घातल्याचा आरोप करत एक व्हिडिओ माजी खासदार निलेश राणे यांनी ट्वीट केला आहे. निलेश राणे यांनी गीतेश राऊतांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.
निलेश राणे यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. 22 सेकंदाचा हा व्हिडिओ आहे. कणकवलीमध्ये एका चौकात गीतेश राऊत यांची पोलिसांनी गाडी अडवली आहे. यावेळी गीतेश राऊत आणि एका पोलिसात गाडी वळवण्यावरून वाद झाला आहे. यावेळी, गीतेश राऊत यांनी दुसऱ्या पोलिसाला, ‘मी खासदार विनायक राऊत यांचा मुलगा आहे, याने मला शिवी दिली, याला मी सोडणार नाही’ असं म्हणत असल्याचं दिसून आलं आहे. तर पोलिसाने पहिली गीतेश राऊत यांनी शिवी दिल्याचं म्हणत आहे. तसंच, या पोलिसाने तू माझी नोकरी घालवणार कोण? असा सवाल केला आहे. या 22 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये कणकवलीमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
‘शिवसेना खासदार विनायक राऊतच्या मुलाने एका पोलिसाला शिवीगाळ केली. भर पावसात एक पोलिसवाला ड्यूटी करतोय आणि खासदाराचा मुलगा दारू पिऊन शुद्धीत नसल्यासारखा त्याला धमकी देतोय. दारू पिऊन गाडी वेडी वाकडी चालवली तर पोलिस पकडणारचं. ही Section 353 आणि 185 अंतर्गत केस बनते’. अस ट्विट निलेश राणे यांनी केले होते.
राष्ट्रवादीच्या निष्ठावंत कार्यकर्त्याच्या निधनानंतर शरद पवार थेट त्या कार्यकर्त्याच्या घरी…
दरम्यान यानंतर आता “सत्तेचा माज कोकणी जनता उतरवतेच”, अशी टीका भाजप नेते आणि माजी आमदार प्रमोद जठार यांनी गितेश राऊत यांच्या कथित व्हायरल व्हिडिओ प्रकरणावर केली आहे. “सत्तेचा माज कोकणातील जनतेने त्या त्या वेळी उतरवला आहे. एकवेळ हे प्रकरण अन्य मार्गाने मिटवले जाईल, तडजोड केली जाईल. मात्र सिंधुदुर्गातील जनता हे बघतेय. ‘ये लोग सब जानते है”, असंही त्यांनी सांगितले.
“तो कोणाचाही मुलगा असुदे, येथील जनता त्यांना माफ करणार नाही. कोरोनाच्या काळात जिवाची बाजी लावून पोलीस, डॉक्टर, नर्सेस काम करत आहेत. जर यांना कुणी अपशब्द बोलत असेल आणि वाईट वागणूक देत असेल तर अशा लोकांना जनता माफ करणार नाही.” अस देखील प्रमोद जठार म्हणाले आहेत.
‘भाजपचा भ्रम लवकरच तुटेल,देशाला याची मोठी किंमत मोजावी लागेल’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

