Share

‘आता लोकं सेल्फीसाठी विचारण्याची हिम्मत करणार नाहीत’ – अभिनेते परेश रावल

Published On: 

मुंबई : सध्या कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. संसर्गातून पसरणाऱ्या या व्हायसरचा संसर्ग थांबवण्यासाठी प्रशासनाने सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यास सांगितले आहे. यावर अभिनेते परेश रावल यांनी एक भन्नाट ट्विट केलं आहे. आणि त्यांचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले असून चाहते त्यावर कमेंट करताना दिसत आहेत.

परेश राव यांनी ट्विटमध्ये सध्या देशात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे काही दिवस लोकं सेल्फी घेण्यासाठी विचारण्याची हिम्मत करणार नाहीत आणि त्यासाठी त्रासही देणार नाहीत असे म्हटले आहे. त्यावर चाहते भन्नाट कमेंट करताना दिसत आहेत.

अभिनेते परेश रावल सध्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. ते सामाजिक विषयांवर उघडपणे त्यांचे मत मांडताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी अभिनेता अक्षय कुमारला पाठिंबा देत त्याला ट्रोल करणाऱ्यांना चांगलेच सुनावले होते.

परेश रावल हे लवकरच ते ‘हंगामा २’ या चित्रपटात काम करताना दिसणार आहेत. या चित्रपटात त्यांच्यासोबत अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि जावेद जाफरीा मुलगा मीजन जाफरी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या व्यतिरिक्त परेश रावल ‘हेरा फेरी ३’मध्ये देखील दिसणार आहेत.

रिकाम्या स्टेडियमवर सामने खेळताना ‘ती’ मजा नक्कीचं हरवलेली असेल : कोहली

भारतच्या मदतीने चीनला धडा शिकवणार, अमेरिकेने आखला 18 कलमी कार्यक्रम

नागराज मंजुळेच्या ‘झुंड’ची पहिली झलक पाहिली का ?

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!