Share

आता मनसे कार्यकर्त्याच अस्सल मराठमोळ जेवण “पिठलं भाकरी अन् ठेचा!”

Published On: 

मुंबई : जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे लोकडाउन वाढतच आहे. लॉकडाऊनमुळे कामकाज ठप्प पडले, अनेक परप्रांतीय मजुरांनी आपापल्या राज्यात स्थलांतरित केले. त्यामुळे याचा फायदा स्थानिकांना रोजगार आणि व्यवसाय वाढवण्याची संधी प्राप्त झाली आहे.

…म्हणून तुकाराम मुंढेंच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल

कोरोना संकटाच्या काळात मराठी तरुण हिंमतीनं उद्योगधंद्यात उतरल्याचं दिसून येत आहे. अनेक ठिकाणी मराठी मुलं भाजीपाल्या व्यवसाय करत आहेत. मनसेकडून अशा तरुणांना प्रोत्साहित केले जात आहे. मनसेच्या एका कार्यकर्त्यांनं कोरोना संकटकाळात वारी तृप्त खवय्यांची अशा नावानं अस्सल मराठामोळ्या जेवणाची मेजवाणी सुरु केली आहे.

शाळा कधी सुरु होणार ? यावर ‘लवकरच निर्णय घेऊ’ – उपमुख्यमंत्री अजित पवार

मनसेच्या नेत्या शालिनी पाटील यांनी याबाबत ट्विट करुन याची माहिती दिली आहे. “संकटातील संधी साधत राजगड कार्यालयातील आमचा सहकारी तुषार पाटील याने पिठलं भाकरी, ठेचा व वांग्याचे भरीत असा मराठमोळा मेनू घरपोच देण्याचा व्यवसाय सुरु केला आहे. एका मराठी तरुणाच्या या उपक्रमास सर्वांनी पाठिंबा देऊन त्याचे मनोबल वाढवूया” अशा शब्दात त्यांनी शुभेच्छा देत कौतुक केले आहे.

तुषार पाटील या तरुणाकडून दादर, माहिम, प्रभादेवी या भागात विनामुल्य घरपोच सेवा पुरवण्यात येत आहे. पिठलं भाकरीसोबतच खमंग पुरणपोळी, उकडीचे मोदक, थालीपीठ, मिसळ-पाव, तसेच मांसाहार प्रेमींसाठी नॉनव्हेज जेवणाची मेजवाणीही घरपोच देण्यात येणार आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!