मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील लेटरवॉरमुळे भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत. राज्यपालांनी आपल्या पत्रात मुंबईतील साकीनाका अत्याचार प्रकरणावरून कायदा सुव्यवस्थेकडे लक्ष वेधले. तसेच कायदा सुव्यवस्थेबाबत मुख्यमंत्र्यांना दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावण्याची सूचना केली आहे. महिलांवरील अत्याचार प्रकरणांमध्ये होणाऱ्या वाढीवरून देखील राज्यपालांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर मुख्यमंत्री ठाकरे यांनी देखील राज्यपालांना प्रत्युत्तर देत इतर राज्यांमधील महिला अत्याचारांचा लेखजोखा मांडला आहे.
आता महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटना हा चिंतेचा विषय असून नुकतीच साकीनाका येथे घडलेली घटना पाहता महिलांच्या सुरक्षेबाबत अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे. मुंबईसह संपूर्ण राज्यातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये सर्वत्र पुरुष सुरक्षा रक्षकच दिसतात त्यांच्यासोबतच महिला सुरक्षा रक्षकही तैनात करावेत, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
नाना पटोले यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले असून या पत्रात पुढे असे म्हटले आहे की, महिलांच्या सुरक्षेसंदर्भात महाराष्ट्र व मुंबईचा नावलौकीक कमी होणार नाही यासाठी सुरक्षेच्या उपाययोजनांमध्ये गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये महिला सुरक्षा रक्षक तैनात करण्याबाबत निर्णय घ्यावा, असा निर्णय झाल्यास महिला सुरक्षेच्यादृष्टीने ते आणखी महत्वाचे पाऊल ठरेल. महिलांच्या विकासासाठी व सुरक्षेसाठी दिशादर्शक राज्य म्हणून महाराष्ट्राचा नावलौकीक आहे. हा निर्णय झाल्यास देशातील इतर राज्यांनाही तो मार्गदर्शक ठरेल. महिलांच्या सुरक्षेचा विचार करता या मागणीवर आपण गांभीर्याने विचार करुन योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मुंद्रा पोर्टवरील ३००० किलो ड्रग्ज प्रकरणात अदानी समूहाने दिले स्पष्टीकरण, म्हणाले…
- आरोग्य विभागाच्या भरतीचे प्रवेश पत्र पुढील दोन दिवसात विद्यार्थ्यांना मिळणार; युवासेनेच्या पाठपुराव्याला आले यश
- सेहवागने पंजाबच्या संघाची उडवली खिल्ली; म्हणाला, ‘बाळाचे डायपर्सही इतक्या वेळा बदलत नाहीत…’
- आयपीएलमध्ये पुन्हा फिक्सिंग ? पंजाबच्या खेळाडूच्या ‘त्या’ पोस्टमुळे बीसीसीआयला शंका
- मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना लिहिलेलं पत्र हे अपरिपक्वतेचं लक्षण; फडणवीसांची खोचक टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

