Share

आयपीएलमध्ये पुन्हा फिक्सिंग ? पंजाबच्या खेळाडूच्या ‘त्या’ पोस्टमुळे बीसीसीआयला शंका

Published On: 

दुबई : इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या हंगामाच्या दुसऱ्या सत्राची धमाकेदार सुरुवात झाली आहे. भारतातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएलचा १४ व हंगाम अर्ध्यावर स्थगित करण्यात आला होता. आता हा हंगाम युएईमध्ये पूर्ण केला जात आहे. काल पंजाब किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्सचा अत्यंत रंजक असा सामना पाहायला मिळाला. राजस्थानने पहिली फलंदाजी करून १८५ धावांचा डोंगर उभा केला.

यानंतर पंजाबने देखील चांगली खेळी करत सामना जिंकण्याचा प्रयत्न केला. अखेरच्या २ षटकांमध्ये या सामन्याने कलाटणी घेतली आणि राजस्थान रॉयल्सने विजय मिळवला. पंजाबने हातातील सामना २ धावांनी गमावला असताना नेटकऱ्यांनी त्यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. अशातच, या रंजक सामन्यानंतर फिक्सिंगचे गंभीर ढग आयपीएलवर जमू लागले आहेत.

सामन्याआधी पंजाब किंग्जच्या दीपक हुड्डा याने सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली होती. हीच पोस्ट आता वादात सापडली असून बीसीसीआयला गंभीर शंका आली आहे. मॅच सुरू व्हायच्या काही तास आधी दीपक हुड्डाने सोशल मीडियावर आपला एक फोटो पोस्ट केला. याला Here We Go असं हुड्डाने दिलं होतं. या फोटोमध्ये दीपक हुड्डाने हेल्मेट घातलं आहे. हाच फोटो आणि या पोस्टची वेळ वादात सापडली आहे. बीसीसीआयचं एण्टी करप्शन युनिट हुड्डाच्या या पोस्टची चौकशी करणार आहे. त्याने भ्रष्टाचारसंबधी नियमांचं उल्लंघन केलं आहे का नाही, हे एसीयू पाहणार आहे.

संघाच्या खेळणाऱ्या अंतिम ११ खेळांडूंबाबत किंवा  संरचनेबाबत अशाप्रकारे माहिती देण्यावर बंदी आहे. या पोस्टमधून आपण प्लेयिंग इलेव्हनमध्ये असल्याचं प्रेरित होत आहे, त्यामुळे दीपक हुड्डाच्या या पोस्टची चौकशी होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!