Share

‘आपली कपॅसिटी संपली, उद्या-परवाचा दिवस बघेन आणि किर्तन सोडून शेती करेन’

Published On: 

🕒 1 min read

शिर्डी : प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्तीनाथ देशमुख अर्थात इंदुरीकर महाराजांनी आपल्या एका किर्तनात मुलगा होण्यासाठी आणि मुलगी होण्यासाठी ठराविक दिवशी शारीरिक संबंध ठेवण्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे चांगलेच वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. त्यांच्यावर याबाबत मोठ्या प्रमाणात टीकेची झोड उठवण्यात आली. याच प्रमाणे इंदुरीकर महाराजांची शिक्षकांची खिल्ली उडवणारी क्लिप व्हायरल झाली आहे, यामुळे ते पुन्हा एकदा वादात आले आहे.

याच पार्श्वभूमीवर त्यांनी याबाबत सविस्तर स्पष्टीकरण केले. शिर्डी येथे याबाबत ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ‘दोन तासांच्या किर्तनात एखादं वाक्य चुकीचं जाऊ शकतं. मात्र मी जे बोललो, ते चुकीचं नाहीच. मी बोललेलं अनेक ग्रंथात नमूद आहे. वादामुळे मला खूप त्रास होत आहे. एक दोन दिवस बघेन आणि किर्तन सोडून शेती करेन,’ असे इंदुरीकर महाराज म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘समतिथीला मुलगा आणि विषमतिथीला मुलगी ही भागवतातही खरंय, ज्ञानेश्वरीतही खरंय. मी म्हणतोय हे खरंय. तरी लोकं म्हणतायेत याला ठेऊन द्या पहिलं. आणि चारी बाजूला… तीन दिवसात अर्धा किलोने कमी झालो हो..आपली आता कपॅसिटी संपली. उद्या-परवाचा दिवस बघायचं, ठेऊन द्यायचा फेटा, आता शेतीच करायची. बस्स.. आता नको मजा नाही राहिली,’ असे इंदुरीकर महाराज म्हणाले.

दरम्यान, ‘यूट्यूबवाले आणि कॅमेरावाले माझ्या मागे लागलेत. यू ट्यूबवाले काड्या करतात. यूट्यूब चॅनलवाल्यांनी मला संपवण्याचा प्रयत्न केला. परंतु सांगतो चॅनल संपतील पण मी नाही,’ असं भाष्य यावेळी बोलताना इंदुरीकर महाराज यांनी केलं.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!