मुंबई : मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या संशयावरून काल गुरुवारी आयकर विभागाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबधित कार्यालयांवर आणि निकटवर्तीयांच्या साखर कारखान्यांवर छापे टाकले आहेत. काल सकाळपासून आयकर विभागाची पथके यावर तपास करत आहेत. यावर अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे.
सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्स, एनसीबी असेल या सर्व यंत्रणांचा वापर करुन भाजपकडून अजित पवारांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. कितीही दबाव आणण्याचा प्रयत्न केला तरीही आमच्या तिन्ही पक्षाचे नेते भित्रे नाहीत. ते कोणत्याही दबावाला बळी पडणार नाहीत. घाबरणार नाहीत. जितक्या कारवाया ते करत आहेत तितक्य ताकदीने हे सरकार कामाला लागले आहेत. महाराष्ट्रातील जनता उघड्या डोळ्यांनी बघत आहे, असं नवाब मलिक म्हणाले आहेत.
भ्रष्टाचार मुक्त करणे म्हणजे गंगेत डुबक्या मारणं असं आहे का? कोणत्या नेत्याने कोणती बँक बुडवली बँक बुडवणारे भाजपचे किती मंत्री आहेत किती नेते आहेत? हे भविष्यात सगळं मी उघड करणार आहे. आता सामना होऊच द्या भाजप विरुद्ध राष्ट्रवादी आम्ही तयार आहोत, असं अव्हान भाजपला मलिकांनी दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- राष्ट्रीय कार्यकारिणीवर नियुक्ती झाल्यानंतर चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…
- कोरोनाळे बंद असलेली धार्मिक स्थळं पुन्हा झाली खुली; राज्यभरातील भाविकांमध्ये उत्साह
- देवेंद्र फडणवीस तब्बल ८ लाख भाजपा कार्यकर्त्यांशी ऑनलाईन संवाद साधणार
- अभिनेता रणबीरच्या ‘या’ चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये वाढलीय उत्सुकता
- ‘या’ जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढला; तब्बल 61 गावांत कडक टाळेबंदी लागू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

