Share

आता औरंगाबाद विमानतळाचेही होणार खासगीकरण?

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबादः देशात मोठ्या प्रमाणावर खासगीकरणाचे वारे वाहत आहेत. आता यात औरंगाबाद विमानतळाचाही समावेश झाला आहे. देशातील विविध विमानतळांचे खासगीकरण होत आहे. औरंगाबादमधील विमानतळाची सविस्तर माहिती मागवण्यात आली होती. ती माहिती वरिष्ठांकडे सादर करण्यात आली आहे. त्यामुळे आता लवकरच औरंगाबाद विमानतळ ही खासगीत समाविष्ट होऊ शकते. औरंगाबाद विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ आहे. मात्र जमीन भूसंपादनाअभावी आत्तापर्यंत या ठिकाणी अनेक सोयी सुविधांची कामे रखडलेली आहेत.

याठिकाणी मोठे विमान उतरण्याची सुविधा नाही. त्यामुळे औरंगाबाद येथील धावपट्टीच्या विस्तारीकरणासह एस-बँड डॉप्लर वेदर रडार, कार्गो सेवेचा विस्तार या सुविधांचा प्रामुख्याने समावेश करण्यात यावा अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. विमानतळ विस्तारीकरणासाठी परिसरातील जमिनीचे भूसंपादनही अद्याप बाकी आहे. देशात अनेक विमानतळांचे खासगीकरण झाले आहे. तर काही ठिकाणी विमानतळांची खासगीकरणाची प्रक्रिया सुरु आहे.

विविध खासगी कंपन्या संबंधित विमानतळावर काय सुविधा आहेत, किती विमान फेऱ्या होतता, दररोज किती प्रवाशांची ये-जा होते आदी माहिती मागवत आहेत. खासगीकरणाच्या यादीत असलेल्या सर्वच विमानतळांची बारीक सारीक माहिती कंपन्यांकडून मागवली जात आहे. औरंगाबाद विमानतळाचाही या यादीत समावेश आहे. नुकतीच अशी परिपूर्ण माहिती पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लवकरच येथील विमानतळ कोणती कंपनी ताब्यात घेणार, याची माहिती समोर येईल. दरम्यान औरंगाबादमधील विमानतळ विस्तारीकरणासाठी लागणाऱ्या जमिनीचे भूसंपादन अद्याप वादात असल्याने या विमानतळाला ताब्यात घेणारी कंपनी याबाबत काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!