Share

‘..आता अनिल परब यांचा नंबर लागणार’, किरीट सोमैय्यांचा खळबळजनक दावा

Published On: 

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणीत आता वाढ झाली असून ईडीने त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यानंतर आता पैशाची अफरातफर केल्याचा आरोप करत ईडीकडूनही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देशमुख यांच्या चौकशीनंतर सीबीआयने गुन्हा दाखल केला हा गुन्हा दिल्लीत दाखल करण्यात आला असून देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आला. दरम्यान ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत.

भाजपा नेते किरीट सोमैय्या यांनी व्हिडीओ शेअर करत आता यानंतर शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांचा नंबर लागणार असल्याचा इशारा दिला आहे. ‘ईडीने अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. १०० कोटींहून अधिक कोटींची अफरातफतर आहे. अनेक बोगस कंपन्या, कोलकातामधून पैसा आला, वाझे वसुली गँगचा हिस्सा असो किंवा २०१०, २०१२ चा पैसा असो…अनिल देशमुख यांना हिशेब द्यावा लागणार. आता पुढे अनिल परब यांचाही नंबर लागणार आहे,’ असं किरीट सोमय्या म्हणालेत.

दरम्यान, ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर अनिल देशमुख यांनी भाष्य करत आपल्यावर राजकीय हेतूनेच आरोप केले जात असल्याच भाष्य केलं आहे. ‘मागच्या काळात सीबीआयच्या माध्यमातून चौकशी झाली. आता ईडीच्या माध्यमातून होणार. मी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा देण्याचं काम हे राजकीय हेतूपोटी होत आहे,’ असं देशमुख म्हणाले. यासोबतच ‘दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणी मी विधानसभेत मत मांडलं. त्यामुळे केंद्र शासन नाराज असू शकते. म्हणून माझी चौकशी होत असावी. मात्र सत्य पुढे येईल’ असं भाष्य अनिल देशमुख यांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!