Share

‘आता अ‍ॅमेझॉनची मस्ती उतरवणारच’ ; राज ठाकरेंना नोटिशीनंतर मनसे आक्रमक

Published On: 

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि अ‍ॅमेझॉन यांच्यात सुरु असलेला ‘नो मराठी, नो अ‍ॅमेझॉन’ वाद आता चिघळला आहे. आता हा वाद कोर्टात गेला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेला अ‍ॅमेझॉननं कायदेशीर नोटीस बजवली आहे.

अ‍ॅमेझॉननं राज ठाकरे यांच्याविरोधात कोर्टात धाव घेतली आहे. दिंडोशी कोर्टानं  या प्रकरणी राज ठाकरेंसह मनसे कामगार सेनेला नोटीस बजावली आहे. 5 जानेवारीला कोर्टात हजर राहण्याचे त्यांना आदेश देण्यात आले आहेत.

यावर मनसे उत्तर देत, ‘अ‍ॅमेझॉनसारख्या प्रतिष्ठित कंपनीने एका चांगल्या लीगल फर्मला अपॉईंट करणं अपेक्षित होतं. पण एखाद्या मूर्ख वकिलाकडून त्यांनी ते लेटर ड्राफ्ट केलं आहे. त्यांनी जी नोटीस पाठवली आहे, त्याला काहीच अर्थ नाही. त्यांनी राज ठाकरेंना नोटीस पाठवण्याचा जो प्रकार केला आहे, त्याची किंमत नक्कीच ॲमेझॉनला येत्या काळात मोजावी लागणार आहे’.असा इशारा अखिल चित्रे यांनी दिला.

“अखिल चित्रे आणि मनसेच्या सरचिटणीसांना याआधी अशाच प्रकारची नोटीस देण्यात आली होती. परंतु सत्र न्यायालयाने पाठवलेल्या नोटिशीच्या आधारे जी सुनावणी झाली, त्याला चांगला दणका दिला आहे. ते इनजंक्शन ऑर्डर फेटाळून लावलं होतं, तरीही परत कायदेशीर डावपेच करुन आता वेळ काढण्यासाठी पक्षाध्यक्षांना मध्ये आणलं आहे. जी काही त्यांच्या वकिलामार्फत नोटीस देण्यात आलेली आहे, त्याला मनसे येत्या काळात कोर्टात चोख कायदेशीर उत्तर देईल” असा इशारा अखिल चित्रेंनी दिला.

जर अ‍ॅमेझॉन येत्या काळात लवकर वठणीवर आला नाही, तर महाराष्ट्रात त्यांचा व्यवसाय ठप्प होणार हे शंभर टक्के गृहीत धरावं, असंही मनसेने बजावलं.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!