टीम महाराष्ट्र देशा : खर्चाच्या तपशीलाबाबत निवडणूक आयोगाकडून अद्याप नोटीस मिळाली नाही. नोटीसच नाही, तर उत्तर कसले देणार, असा प्रतिप्रश्न करत नोटीस आल्यावर काय ते बघू, अशी भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतली आहे.
लोकप्रतिनिधी कायद्यानुसार निवडणूक लढविणाऱ्यांना, पक्षांना ९० दिवसांत खर्चाचा तपशील सादर करावा लागतो. जे पक्ष निवडणूक लढवित नाहीत त्यांना तेही बंधन नाही. इथे तर अद्याप निवडणुका सुरू आहेत. तरीही निवडणूक आयोगाला घाई झाली असेल तर ‘मोदी है तो मुमकीन है’, असेच म्हणावे लागेल, असा टोला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी लगावला आहे.


