Share

मराठी भाषेत नामफलक न लिहिणाऱ्या धार्मिकस्थळांवर कारवाई

Published On: 

ठाणे : महाराष्ट्रात कायद्याने मराठी भाषेत ठळक अक्षरात नामफलक लिहणे बंधनकारक आहे. मात्र, दुकाने, आस्थापने, धार्मिक स्थळांवर मराठीत फलक लिहिण्याचे टाळले जाते. याच पार्श्वभूमीवर नामफलक मराठी भाषेत न लिहिणाऱ्या मीरारोड येथील चार धार्मिक स्थळांना सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या अधीक्षकांनी नोटीस बजावल्या आहेत. नोटीस मिळाल्यानंतर फलक मराठी भाषेत ठळक अक्षरात लावण्यात यावेत असे सांगण्यात आले आहे.

कायद्याने मराठी भाषेत ठळक अक्षरात नामफलक लिहणे बंधनकारक असताना सुद्धा अनेक आस्थापना, धार्मिक स्थळे, हॉटेल आदी ठिकाणी मराठी भाषेचा अनादर करून इतर भाषेत फलक लावतात. मराठी एकीकरणी समितीने सुद्धा मराठीत नामफलक असावेत यासाठी धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार केली होती. तसेच मीरारोडच्या शांती नगर सेक्टर ४ मधील एक व सेक्टर ६ मधील दोन धार्मिक स्थळे तर साईबाबानगर मधील एका धार्मिक स्थळांच्या मराठीत नामफलक नसल्याबाबतची तक्रार निनाद सावंत या नागरिकाने केली होती.

त्याची दखल घेत ठाणे अधीक्षक यांनी संबधित मीरारोडमधील चारही धार्मिक स्थळांना नोटीस बजावल्या आहेत. नोटीस मिळाल्यानंतर धार्मिक स्थळांवरील नामफलक मराठी भाषेत ठळक अक्षरात लावण्यात यावेत. तसेच मराठी भाषेत नामफलक लावले असल्याचे लेखी स्वरुपात कळवावे असे निर्देशच धार्मिक स्थळांना देण्यात आले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!