🕒 1 min read
नवी दिल्ली : मोहाली कसोटी सामन्यात भारताचा दिग्गज फिरकीपटू आर अश्विनने भारताचे महान क्रिकेटपटू कपिल देव यांचा मोठा विक्रम मोडला आहे. सर्वात जास्त विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत तो आता दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. त्याच्या या प्रदर्शनावर भारताचा कर्णधार रोहित शर्मा खूप खुश झाला आहे. आणि तो म्हणाला अश्विन ‘ऑल टाईम ग्रेट’ खेळाडू आहे.
त्यातच अश्विनने त्याच्या या विधानाला उत्तर दिले आहे. अश्विन म्हणाला, “मला सुचत नाही त्याला काय म्हणू, जेव्हा माझी कोणी प्रशंसा करते, तेव्हा मला त्याला काय उत्तर ध्यावे, हे कळत नाही. कधी कधी मी भावूक ही होतो. परंतु आत्ता त्याच्यासाठी काहीच शब्द नाहीत. त्याने एका प्रेस कॉन्फरन्समध्ये माझी प्रशंसा केली.”
मोहाली कसोटीत खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात त्याने ४३६ कसोटी विकेट्स चा टप्पा गाठला आहे. त्याने या सामन्यात एकूण ६ विकेट्स घेतल्या तर ६१ धावा ही केल्या.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
