Share

राज्यपाल नाही, मी तर राज्यसेवक आहे :भगतसिंह कोश्यारी

Published On: 

🕒 1 min read

नाशिक : ‘मी राज्यपाल नाही. तर राज्याचा सेवक आहे. दान देणाऱ्या दानशुरांमुळेच देश चालतो. अंध विद्यार्थ्यांकडून काम करणाऱ्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांना दैवी देणगी मिळाली आहे. त्यामुळे दृष्टी बाधितांसाठी काम करणाऱ्यांना अभिवादन. शासनात काम करणाऱ्यांना देखील दैवी दृष्टी मिळावी,’ असा टोला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी लगावला.

नाशिकमधील नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाईंडच्या कार्यक्रमाला राज्यपालांनी उपस्थिती लावली होती. यावेळी ते बोलत होते. दरम्यान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नुकतंच गुलाबी गाव भिंतघर या ठिकाणी हजेरी लावली. यावेळी त्यांच्या हस्ते सुरगणा येथे आदिवासी लाभार्थ्यांना वनकट्ट्यांचं वाटप करण्यात आलं. एकूण १११३७ लाभार्थ्यांना राज्यपालांच्या हस्ते सातबारा प्रदान करण्यात आले. त्यावेळी राज्यपालांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं.

याप्रसंगी विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवळही उपस्थित होते. यावेळी झिरवळ यांनी राज्यपालांकडे या भागाची समस्या मांडली. या भागात भरपूर पाऊस पडतो. पण सर्व पाणी समुद्राला वाहून जातं. पाणी अडवण्यासाठी तुम्ही मदत करा. हा भाग समृद्ध होईल, असं झिरवळ म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!