औरंगाबाद : ज्येष्ठ नागरिकांसाठी खुशखबर… महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी स्मार्ट कार्ड योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत ४००० किलोमीटर प्रवास मोफत करता येणार आहे. त्याकरिता महामंडळाकडून स्मार्ट कार्ड प्राप्त करणे आवश्यक आहे. आपले आधार कार्ड व मतदान कार्ड किंवा मतदान स्लिप देऊन आणि ५५ रुपये भरून आपणास जवळच्या एसटी डेपोत हे कार्ड मिळेल. जाताना स्वतःचा मोबाइल नेण्यास विसरू नये. या अशा ची जाहिरात सर्वत्र फिरत आहे मात्र ही जाहिरात नसून एक प्रकारची अफवा आहे.
ज्येष्ठांसाठी एसटी महामंडळाने ४ हजार किमी माेफत प्रवासाची सवलत दिली आहे. त्यासाठी ६५ वर्षांवरील नागरिकांनी फक्त ५५ रुपये भरून एक स्मार्ट कार्ड घ्यायचे आहे. असे मेसेज एसटी महामंडळाच्या लाेगाेसह साेशल मीडियात व्हायरल हाेत आहेत. मात्र महामंडळाने अशी काेणतीही याेजना जाहीर केलेली नाही. प्रवाशांनी व ज्येष्ठांनी अफवांवर विश्वास ठेवून काेणाशीही आर्थिक व्यवहार करू नयेत, असे आवाहन औरंगाबादचे विभागीय नियंत्रक अरुण सिया यांनी केले आहे.
एसटी महामंडळाच्या नावाचा आणि लोगो वापरून या याेजनेसंदर्भात अफवा पसरवणारे मेसेज पसरवले जात आहेत. यातून अनेकांची फसवणूक हाेण्याची शक्यता आहे. असे मेसेज फिरत आहेत. मात्र ते पूर्णपणे खाेटे असल्याचेही एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले आहे. मका आत्तापर्यंत हा मेसेज पसरवणाऱ्यांनी कित्येकांना गंडा घातला असेल याबाबत कुठलीही माहिती समोर आलेली नाही. अशा अफवांवर विश्वास न ठेवता एसटी महामंडळ ककार्यालयात खातरजमा केल्याशिवाय पैसे न भरण्याचे आवाहन एसटी महामंडळाकडून करण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘शिंदेंनी ‘ते’ नारायण राणेंच्या कानात सांगितलं असेल तर मी…’; आशिष शेलार यांचं सूचक विधान
- एकनाथ शिंदेंनी धुडकावले राणेंचे ते वक्तव्य; म्हणाले…
- ‘तेव्हा राज ठाकरे माझ्यासाठी पाऊण तास उन्हात थांबले; पण शिवसेनेचं कोणी फिरकलंही नाही’
- लीड्समध्ये टीम इंडियाला विजयाची हमी ‘हे’ आहे खरे कारण
- महाराष्ट्रावर कोरोनाची तिसरी लाट उसळणार ? ; तज्ज्ञांनी केला मोठा खुलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

