Ramdas Kadam । मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरील कारवाईमुळे शिवसेना चांगलीच अडचणीत आली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी मोठं वक्तव्य केले आहे. महाराष्ट्रात शिवसेना संपत आहे. आता केवळ भाजप राहणार, असे वक्तव्य नड्डा यांनी पाटणा येथे केले आहे. भाजपशी लढण्याची क्षमता अन्य कोणत्याही पक्षात नाही भाजपसोडून सर्व राजकीय पक्ष संपतील, असे नड्डा म्हणाले. यानंतर शिवसेना नेते आक्रमक झाले आहेत. यावर आता माजी मंत्री आणि शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
रामदास कदम म्हणाले कि, जेपी नड्डा यांच्या वक्तव्याशी मी सहमत नसल्याचं रामदास कदम म्हणाले आहेत. उद्धव ठाकरेंच्या नियंत्रणाखालील शिवसेना संपत चालली, असा खुलासा जेपी नड्डा यांनी केला असेल. त्याच्याशी मी सहमत आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच काम सुरू आहे. त्यामुळं शिवसेना संपायचा प्रश्न येत नाही, असं ते म्हणाले आहेत.
काल संभाजीनगर येथे कार्यक्रमाचं आयोजन केलं होत. त्या कार्यक्रमाला संभाजीनगरला हजारो लोकं काल शिवसेनेच्या कार्यक्रमात आले होते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या काळात जशी लोकं एकत्र यायची, तसं चित्र काल संभाजीनगरात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात पाहायला मिळाला. त्यामुळं बाळासाहेबांची शिवसेना अजून संपलेली नाही, असं रामदास कदम म्हणाले.
दरम्यान , पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी नड्डा यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला होता. ते म्हणाले की, सर्वच लोकांनी आता डोळे उघडून पाहायला पाहिजे. जिथे नेऊ इच्छितात तिथे नेऊ द्या. त्यात मदत करायची की नाही हे सामान्य नागरिकांनी ठरवायची वेळ आली आहे. भाजपसोबत लढणारा आज कोणताच राजकीय पक्ष नाही. नड्डांचे विधान हे देशाला हुकूमशाहीकडे नेणारे असून, ओडिसा, तेलंगणा, तामिळनाड महाराष्ट्रात शिवसेना ही संपण्याच्या मार्गावर असल्याचे म्हटले आहे. त्यांनी हा एकदा करून बघावं, असे आव्हान ठाकरे यांनी नड्डांना दिले आहे.
तसेच पुढे राष्ट्रवादी कुटुंबाचा पक्ष, काँग्रेस भाऊ बहिणाचा पक्ष असून भाजपला वंशवादाच्या विरोधात लढायचं आहे. या सगळ्यामध्ये भाजपचा वंश पहिले कुठून सुरू झाला हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण तेच म्हणतात की, इतर पक्षात काम केलेले लोक आपल्याकडे येत आहेत. मग जर इतर पक्षातील लोक त्यांच्याकडे येणार असतील तर, मग भाजपचा वंश तरी नेमका कोणता हे तपासणे महत्त्वाचे आहे, असं ठाकरे यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Ramdas Kadam : “तुम्ही राष्ट्रवादीचे गुलाम…”; रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंना सवाल
- Ramdas Kadam : उद्धव ठाकरे भाजपासोबत युती करण्यास तयार झाले होते; पण संजय राऊत…, रामदास कदमांचा गौप्यस्फोट
- NCP on Eknath Shinde | “मुख्यमंत्री जर ‘खऱ्या’ शिवसेनेचे असतील तर…” ; राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ शिंदेना आव्हान
- Uddhav Thackeray | इतरांना संपवण्याच्या मागे लागाल तर दिवस सर्वदा सारखे नसतात – उद्धव ठाकरे
- Deepak Kesarkar । राऊतांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी वेळ, मग यामिनी जाधव, भावना गवळींना का भेटले नाही?; केसरकरांचा सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

