Share

जेएनयूत तोडफोड केलेल्यांपैकी अद्याप एकालाही अटक नाही; सरकारची संसदेत माहिती

Published On: 

नवी दिल्ली : दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) परिसरात जानेवारी २०२० मध्ये झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत कोणालाही अटक झालेली नाही. द्रविड मुनेत्र कळघम (द्रमुक) पक्षाचे खासदार दयानिधी मारन यांच्या प्रश्नावर गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लाोकसभेत ही माहिती दिली.

राय म्हणाले, जेएनयू परिसरातील हिंसाचार प्रकरणात तीन प्रकरणांच्या तपासासाठी दिल्ली पोलिसांनी विशेष टीम स्थापन केली आहे. या प्रक्रियेत इतर गोष्टींसह परीक्षा, फुटेजचे संकलन, विश्लेषण व संशयितांच्या पडताळणीचा समावेश आहे. गेल्या वर्षी पाच जानेवारी रोजी सुमारे चार तासांपर्यंत काठ्या घेतलेल्या १०० हल्लेखोरांनी जेएनयूमध्ये धुडगूस घातला होता. परिसराच्या आत तोडफोड केली होती. त्यात ३६ विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी जखमी झाले होते.

त्याचा तपास दिल्ली पोलिसांची गुन्हे शाखा करत आहे. जेएनयू प्रकरणात नेमकी अटक का झाली नाही ? असे प्रश्न उपस्थितीत होतात. परंतु ठोस पुरावे नसल्याने अशा प्रकारची कारवाई करण्यात आली नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दीड वर्षांपूर्वीच्या याप्रकरणामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!