Share

दमदार स्मार्टफोन्सनंतर आता नोकियाचा पहिला लॅपटॉप लाँच !

Published On: 

नवी दिल्लीः सुरीवातीच्या काळामध्ये मोबाईल विश्वामध्ये अत्यंत महत्वाचे स्थान असलेली कंपनी म्हणजे नोकिया आज अनेक कंपन्यांनी बाजार पेठेत आपले वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर नोकिया या स्पर्धे मध्ये मागे पडली. त्यामुळे ग्राहकांडून देखील नोकिया विस्मरणात गेल्या प्रमाणे झाली होती. मात्र आता फिनिक्स पक्षा प्रमाणे नोकिया कंपनी पुन्हा भरारी घेत आहे.

दमदार स्मार्टफोनसाठी ओळखल्या जाणाऱ्या नोकिया कंपनीने लॅपटॉपची मार्केटमध्ये एन्ट्री केली आहे. या लॅपटॉपचे खास वैशिष्ट्ये म्हणजे हा खूपच स्लिम असून याचे वजन केवळ १.१ किलोग्रॅम आहे. याची प्री बुकिंग १८ डिसेंबर पासून सुरू होणार आहे.

ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने आज Nokia PureBook X14 लॅपटॉप लाँच करीत असल्याची घोषणा केली आहे. या लॅपटॉपची किंमत ५९,९९० रुपये आहे. नोकियाच्या Nokia PureBook X14 ची प्री बुकिंग १८ डिसेंबर पासून सुरू होणार आहे.

8GB DDR4 RAM आणि 512GB NVMe SSD सोबत येणाऱ्या या लॅपटॉप मध्ये इंटेल i5 10th Gen क्वॉड-कोर प्रोसेसर दिला आहे. विंडोज १० ओएस सोबत येणाऱ्या या लॅपटॉपमध्ये १४ इंचाचा फुल एचडी एलईडी बॅकलिट स्क्रीन दिली आहे. या लॅपटॉपचा स्क्रीन टू बॉडी रेशियो ८६ टक्के आहे.

नोकिया प्योरबुक एक्स १४ चे वजन १.१ किलोग्रॅम आहे. केवळ 16.8mm रुंदीचा लॅपटॉप खूप स्लिक डिझाइन सोबत येतो. दमदार साउंड साठी या लॅपटॉपमध्ये डॉल्बी ऑडियो सपोर्ट दिला आहे. तर जबरदस्त ग्राफिक्ससाठी या लॅपटॉपमध्ये तुम्हाला 1.1 Ghz टर्बो GPU सोबत इंटीग्रेटेड इंटेल UHD 620 ग्राफिक्स कार्ड मिळणार आहे.

हा लॅपटॉप ८ तासांच्या बॅटरी लाइफ सोबत येतो. बॅटरी लवकर चार्ज होण्यासाठी यात ६५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. कनेक्टिविटीसाठी या लॅपटॉपमध्ये ड्यूल बँड वाय फाय, ब्लूटूथ ५.१ यूएसबी ३.१, यूएसबी २.०, सिंगल HDMI पोर्ट और एक RJ45 पोर्ट दिले आहे. लॅपटॉपमध्ये सिंगल ऑडियो आउट पोर्ट आणि एक माइक पोर्ट दिला आहे.

या लॅपटॉपमध्ये मिळणारे अतिरिक्त फीचर म्हणजे यात विंडोज हेलो फेस अनलॉक सोबत HD IR वेबकॅम, अजस्टेबल बॅकलाइटचा कीबोर्ड आणि मल्टिपल जेस्चर ऑप्शनचा टचपॅड दिला आहे. या प्रकारचे फिचर असलेला हा नोकिया चा पहिलाच लॅपटॉप ग्राहकांच्या भेटीला येत आहे. तर विशिष्ट असा ग्राहक वर्ग कायम असणार्या नोकिया च्या या लॅपटॉप ची वाट पाहत आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!