मुंबई : राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे नेहमीच चर्चेत आणि वादात सापडलेले असतात. त्यांनी पदभार स्वीकारल्या पासून ते वादात आहेत. यामध्ये सत्ता स्थापनेचा तिढा असो की, सरकारचा एखादा निर्णय त्याचबरोबर महाआघाडी सरकार आणि भाजप मधील टीका टिप्पणी मध्ये देखील कोशारी यांचा समावेश पाहायला मिळतो.
गेल्या आठवड्यात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना राज्य सरकारने विमान नाकारल्यावरून राजकारण तापले होते. शिवसेना विरोधात भाजपा असे द्वंद्व रंगले होते. यावर आता माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना आणि सरकारवर टीका केली आहे.
मागील आठवड्यात राज्यपालांच्या हवाई प्रवासाला मुख्यमंत्री कार्यालयाने परवानगीच दिली नसल्याचं समोर आलं होत. आश्चर्य म्हणजे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी विमानात बसल्यानंतर त्यांना परवानगी नसल्याचं कळलं. त्यामुळे राज्यपालांवर विमानातून उतरुन परत राजभवनावर येण्याची नामुष्की ओढावली होती.
यानंतर ते खासगी विमानाने उत्तराखंडला पोहोचले. यावर शिवसेनेने खासगी कार्यक्रमांना सरकारी विमान कसे मिळेल, असे कारण देत भाजपाच्या आरोपांना उत्तर देण्यात आले होते. यावर आता फडणवीस यांनी राज्यपालांची बाजू मांडली आहे.
राज्यपालांनी एकही असंवैधनिक कृत्य केलेलं नाही. राज्याचं सरकार सारंकाही स्वत:च्या मालकीचं असल्यासारखं वागतेय, असा आरोप फडणवीस यांनी केला. लोकमतच्या एका कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.
महत्वाच्या बातम्या
- दिशा रवी – ग्रेटा थनबर्ग यांच्यातील व्हॉट्सअप चॅट्स, वाचा Toolkit बाबत काय म्हणाल्या दोघी?
- रिहानाने पुन्हा खाल्ली माती, गळ्यात गणपतीचं पेंडंट घालून पोस्ट केला टॉपलेस फोटो
- BMCचे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडेच, भाजपची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली
- दिशा रवी अटकेप्रकरणी महिला आयोगाने दिल्ली पोलिसांना बजावली नोटीस
- ‘राहुल गांधी दम असेल तर गुजरातेतून निवडणूक लढवून दाखवा!’


